हार्ले डेव्हिडसनची ई बाईक- लाइववायर


अमेरिकन बाईक निर्माती हार्ले डेव्हिडसनने त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाइववायर नावाने लाँच केली असून लवकरच ती रस्त्यावर दिसेल. या बाईकसाठी दोन वर्षे फ्री चार्जिंग देण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. युएस मध्ये इलेक्ट्रिफाईड अमेरिका स्टेशनवर ती दोन वर्षे मोफत चार्ज करता येणार आहे.

या बाईकची किंमत २९७९९ डॉलर्स म्हणजे साधारण २० लाख रुपये आहे. याच वर्षात ती अमेरिका, कॅनडा व अनेक युरोपियन देशात उपलब्ध केली जात असून २०२०-२१ मध्ये अन्य मार्केट मध्ये एक्स्पोर्ट केली जाणार आहे. या बाईकला हार्ले डेव्हिडसनचा सिग्नेचर लुक दिला गेला आहे. बाईकला रॅपीड एक्सलरेशन दिले गेले असून त्यामुळे ही बाईक ० ते १०० चा वेग फक्त तीन सेकंदात घेऊ शकते.

बाईकचे डिझाईन अर्बन स्ट्रीट रायडरप्रमाणे असून ती सिंगल चार्जवर २३५ किमी अंतर कापू शकते. डीसी फास्ट चार्जिंगमुळे ती एक तासात पूर्ण चार्ज होते. बाईकला सात रायडींग मोडस दिले गेले आहेत. शिवाय ४.३ इंची कलर टीएफटी टचस्क्रीन आणि एलइडी हेडलँप दिले गेले आहेत.

Leave a Comment