कारगिल शाहिदांना रेल्वेची अशी श्रद्धांजली


येत्या २७ जुलै रोजी देशभर कारगिल विजय दिवस साजरा होत असून या दिवसानिमित्त कारगिल शाहिदांना भारतीय रेल्वे विशेष श्रद्धांजली वाहणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने रेल्वे गाड्यांच्या ७०० पेक्षा अधिक कोच मध्ये कारगिल शाहिदांची पोस्टर लावली जाणार आहेत. त्यानिमित्ताने देशाच्या या असली हीरोचे स्मरण केले जाणार आहे. सोमवार पासून पोस्टर लावण्याची सुरवात केली जात आहे.

सर्वप्रथम ही पोस्टर काशी विश्वनाथ ट्रेन कोच मध्ये लावली जात आहेत. ही विनायाल पोस्टर्स लष्कराने तयार केली आहेत. रेल्वे डब्यात दरवाजांच्या जवळ ती लावली जातील. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व देश शाहिदांना श्रद्धांजली देत आहे त्यात रेल्वे सहभागी आहे. ही पोस्टर विनायल असल्याने नंतर काढली गेली तरी रेल्वे पेंट खराब होणार नाही. म्हणून ती त्या स्वरुपात तयार केली गेली आहेत.

Leave a Comment