टीम इंडियाच्या फलंदाजी मास्तराची होणार हकालपट्टी


मँचेस्टर – विश्वचषक स्पर्धेतील उत्कंठावर्धक ठरलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा १८ धावांनी न्यूझीलंडने पराभव करत अंतिम फेरी गाठली. विश्वविजेतेपदाचे भारताचे स्वप्न या पराभवासोबतच भंगले आहे. भारताच्या फलंदाजांनी या सामन्यात सपशेल शरणागती पत्करली. टीम इंडियाचे साहाय्यक प्रशिक्षक आणि फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांच्यावर या कामगिरीमुळे निलंबनाची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे.

विश्वचषकामधील टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सहाय्यक स्टाफच्या करारात 45 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर असे काही बांगर यांच्याबद्दल करण्यात आलेले नाही. स्पर्धेमध्ये बांगर यांना अधिक चांगले प्रदर्शन करता आले असते असे मत बीसीसीआयने व्यक्त केले आहे.

भारताची सुरुवात उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये खूपच खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला रोहित शर्मा व कर्णधार कोहली प्रत्येकी १ धाव काढून बाद झाले. त्यानंतर सलामीवीर के.एल. राहुलही एक धाव काढून बाद झाल्याने भारतावर दडपण आले. हार्दिक पांड्या व (३२ धावा) पंतने (३२) काही आकर्षक फटके खळून सामन्यातील आव्हान जिंवत ठेवण्याचा प्रयत्न केला. दोघे बाद झाल्यानंतर धोनी व जडेजाने विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र दोघांची झुंज अपयशी ठरली व भारताला न्युझीलंडकडून १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागून स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला.

Leave a Comment