अफगाणिस्तान संघाची धुरा वाहणार राशिद खान!


नवी दिल्ली – आपल्या फिरकी गोलंदाजीवर भल्या भल्या फलंदाजांना नाचवणाऱ्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा अव्वल गोलंदाज राशिद खानवर क्रिकेट बोर्डाने नवी जबाबदारी आली आहे. राशिदची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाच्या कर्णधारपदाची नियुक्ती करण्यात आली आहे.


आता अफगाणिस्तानच्या तीनही संघाचा म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि टी- २० संघाचा राशिद खान कर्णधार असेल. विश्वचषक स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू गुलाब्दिन नैब हा संघाचा कर्णधार होता. पण आता त्याची उचलबांगडी करत राशिदला बोर्डाने कर्णधारपद बहाल केले आहे. तर, माजी कर्णधार असगर अफगाणला उपकर्णधार म्हणून नेमले आहे.

नव्या कर्णधाराची आणि उपकर्णधाराची घोषणा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन अझीझुल्ला फझली यांनी केली. याआधी, विश्वचषक स्पर्धेत असगर अफगाणला हटवून गुलाब्दिन नैबला कर्णधार केले होते. नैबच्या कर्णधारपदावरुन संघामध्ये नाराजी पसरली होती.

Leave a Comment