बनावट हेल्मेट बेतू शकते तुमच्या जीवावर


आज देशात दंड बसतो म्हणून हेल्मेट घालणाऱ्यांची संख्या अधिक आहे. खुप कमी लोक असे आहेत जे सुरक्षेच्या कारणामुळे योग्य दर्जाचे हेल्मेट खरेदी करतात. देशात बनावटी हेल्मेटच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्याच्या कडेला अथवा लोकल दुकानांमध्ये 100 पासून ते 300 रुपयांपर्यंत बनावटी हेल्मेट सहज मिळते. अनेक वेळा या हेल्मेटवर नकली आयएसआय मार्क स्टिकर लावून विकले जाते. याच कारणामुळे देशात अपघातामध्ये अनेक जण आपला जीव गमवतात. मात्र हे नकली हेल्मेट तुमच्या डोळ्यांसाठी देखील घातक ठरू शकते.

बनावटी हेल्मेट डोळ्यांसाठी घातक
बनावटी हेल्मेट निकृष्ट दर्जांच्या वस्तूंपासून बनवण्यात आलेले असते. त्याचबरोबर हेल्मेटमध्ये असलेली समोरील पारदर्शक काच युवी सुरक्षित नसते. ज्यामुळे कडक उन्हात डोळ्यांना त्रास होतो. याचबरोबर रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या गाड्यांच्या हाय बीम लाईटचा सरळ डोळ्यांवर परिणाम होतो. यामुळे दिसणे कमी होते. चांगल्या दर्जाच्या हेल्मेटमध्ये युवी प्रोटेक्शन वापरण्यात आलेले असते. ते कडक उन्हात डोळ्यांची रक्षा करते.

आयएसआय मार्क असणारे हेल्मेट किती सुरक्षित
देशातील प्रसिध्द हेल्मेट निर्माता कंपनी स्टीलबर्ड हेल्मेटचे एमडी राजीव कपूर यांचे म्हणणे आहे की, आयएसआय मार्क असणारेच हेल्मेट नेहमी खरेदी करावे व घालावे. आयएसआय मार्क असणारे हेल्मेट 300-400 रुपयांमध्ये बनूच शकत नाही. हे हेल्मेट दंडापासून तर वाचवू  शकते. मात्र अपघात झाल्यावर तुमचे प्राण वाचवणार नाही. बनावटी हेल्मेट विकणे हे बनावटी औषधे विकण्यासारखे आहे. चांगल्या दर्जाच्या हेल्मेटमध्ये सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. ते हेल्मेट अनेक प्रक्रियेतून गेलेले असते. आकड्यांनुसार भारतात दरवर्षी दहा लाखांपेक्षा अधिक लोकांचा अपघातात मृत्यू होतो.

असे ओळखा बनावटी हेल्मेट
राजीव कपूर यांच्यानुसार, आज देशात 80 टक्के बनावटी हेल्मेटची विक्री होत आहे. मात्र या हेल्मेटची ओळख करणे सोपे आहे. जर कोणी तुम्हाला 450 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हेल्मेट विकत असेल तर समजून जा की, ते हेल्मेट नकली आहे. आयएसआय मार्क असणारे हेल्मेट एवढ्या कमी किंमतीत बनूच शकत नाही.

भारतात दरवर्षी 10 करोड हेल्मेटची मागणी
सध्या भारतात हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे. मात्र हा कायदा केवळ दिल्ली, चंदीगड आणि जयपूरमध्ये प्रभावीपणे लागू आहे. मोटर व्हिकल अॅक्टमध्ये सरकार लवकरच बदल करून हेल्मेट सक्ती करणार आहे. त्यामुळे बाजारातील हेल्मेटची मागणी वाढेल.

बनावटी हेल्मेटच्या फॅक्ट्र्या
दिल्लीमध्ये बनावटी हेल्मेटच्या अनेक फॅक्ट्र्या आहेत. यावर बंदी आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बनावटी हेल्मेट बनवणाऱ्यांवर देखील कारवाई केली पाहिजे. जेणेकरून लोक चांगल्या दर्जाचे हेल्मेट खरेदी करतील.

का खरेदी केले जातात बनावटी हेल्मेट ?
विचार करण्याची गोष्ट ही आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावटी हेल्मेटची विक्री कशी होते लोक स्वतःच्याच जीवाची पर्वा करत नाही का अनेक लोक कमी किमतीत बनावटी हेल्मेट मिळत असल्याने खरेदी करतात.

हेल्मेट घालण्यास नकार का ?
अनेक वेळा आपण बघतो की, लोक हेल्मेट हातात अडकवून गाडी चालवत असतात. लोकांचे म्हणणे आहे की, हेल्मेटमुळे गुदमरते व खुप घाम येतो. तसेच    उन्हाळ्यात घामामुळे खाज व केस जाण्याची शक्यता असते. तर महिला हेअरस्टाइल खराब होईल या कारणामुळे हेल्मेट घालणे पसंद करत नाही. यावर हेल्मेट बनवणाऱ्या कंपन्यांनी सांगितले की, आता ते कमी वजनाचे हेल्मेट बाजारात आणणार आहेत. तसेच हवा आत-बाहेर जाण्यासाठी देखील सोय करणार आहेत.

नवीन टेक्नोलॉजी असणारे हेल्मेट
युवकांना लक्षात घेऊन कंपन्या नवनवीन हेल्मेट आणत आहेत. वजनाने कमी आणि ग्राफिक्स असणारे हेल्मेट बाजारात येत आहेत. हेल्मेटमध्ये देखील नवनवीन टेक्नोलॉजी पहायला मिळत आहे. मार्केटमध्ये एंटी बैक्टीरियल हेल्मेट, हॅड्सफ्री हेल्मेट, कार्बन फाइबर हेल्मेट आणि वेंटीलेशन हेल्मेट येत आहेत. याचबरोबर फोटो क्रोमेटिक वायजर असणारे हेल्मेट देखील लॉच झाले आहेत. हे वायजर दिवसा काळे तर रात्री सामान्य होतात. हे डोळ्यांसाठी चांगले असतात.

खरेदी करताना या गोष्टींकडे द्या लक्ष
मार्केटमध्ये प्रत्येक रंगाचे व वेगवेगळ्या डिझाईनचे हेल्मेट उपलब्ध आहेत. हेल्मेट वायजर गडद रंगाचे नसावे, त्यामुळे रात्री गाडी चालवताना त्रास होऊ शकतो. जर हेल्मेट एखाद्या ठिकाणी तुटलेले असेल, तर ते घेणे टाळावे. चांगल्या दर्जाचे वायजर आणि फोमची लायनिंग सहज बाहेर येते असेच हेल्मेट खरेदी करावे.

Leave a Comment