इथेनॉलवर चालणारी नवी इको फ्रेंडली बाईक टीव्हीएसने केली लाँच - Majha Paper

इथेनॉलवर चालणारी नवी इको फ्रेंडली बाईक टीव्हीएसने केली लाँच


इथेनॉलवर चालणारी पहिली बाईक टीव्हीएसने भारतात लाँच केली. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी टीव्हीएस आरटीआर 200 एफआय ई 100 लाँच करताना उपस्थित होते.

हिरव्या रंगाचे ग्राफिक्स आणि इथेनॉल लोगो अपाचे आरटीआर 200 एफआय E100 या बाईकला देण्यात आला आहे. या बाईकमध्ये ट्विन स्पे ट्विन पोर्ट ईएफआय टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे.

8500 आरपीएमवर ही बाईक 21 पीएसची पॉवर आणि 7000 आरपीएमवर 18.1 न्यूटन मीटरचा टार्क जनरेट करते. 129 किमी प्रति तासाच्या स्पीडने ही बाईक चालते. ही बाईक कुठल्याही स्थितीत शानदार पॉवर देते.

भारतात इथेनॉल रिन्यूएबल प्लँटद्वारे तयार होते. इथोनॉल प्रवासासाठी सुरक्षित मानले जाते. शिवाय यामुळे प्रदूषण होत नाही. ही बाईक 2018 मध्ये दिल्लीत झालेल्या ऑटो प्रदर्शनात पहिल्यांदा समोर आली होती. ती आता भारतात लाँच करण्यात आली आहे. 1 लाख 20 हजार रुपये एवढी बाईकची किंमत आहे.

Leave a Comment