नायगारामध्ये १८८ फुटावरून उडी मारूनही गेला नाही जीव


कॅनडाच्या हद्दीत येणाऱ्या नायगारा या जगप्रसिद्ध धबधब्यात १८८ फुटांवरून पडूनही जीव वाचल्याची घटना नुकतीच घडली आहे. या व्यक्तीने आत्महत्या करण्यासाठी नायगरात उडी मारली होती असे समजते. पण १८८ फुटांवरून उडी मारूनही हे व्यक्ती वाहत येऊन किनाऱ्याला लागली व शेवटी एका खडकावर बसलेली पोलिसांना आढळली.

कॅनडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नायगारा मध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याचा कॉल त्यांच्याकडे आला. १८८ फुटांवरून हॉर्स शु फॉलमध्ये हि व्यक्ती पडल्याचा संदेश येताच पोलिसांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. दीड तास शोध घेताल्यावर ही व्यक्ती एका खडकावर बसलेली आढळली. नायगारा मध्ये पडूनही वाचल्याची १९६० पासूनची ही पाचवी वेळ आहे.

१९६० मध्ये ९ जुलै रोजी ७ वर्षाचा रॉजर वूडवर्ड नावाचा मुलगा नायगारात वाहून गेला पण त्याच्या १७ वर्षाच्या बहिणीने त्याला वाचविले. अक्टोबर २०१३ मध्ये किवी जोनेस या धबधब्यात पडला आणि त्याच्या फासळ्या तुटल्या. त्याने हा प्रकार स्टंट म्हणून केला होता त्यामुळे त्याला ३ हजाराचा दंड ठोठावला गेला होता. त्याने पुन्हा २०१७ मध्ये हीच आगळीक केली पण यावेळी मात्र तो मृत्युमुखी पडला. २००९ आणि २०१२ मध्ये अनुक्रमे ३० वर्षाचा आणि ४० वर्षाचा माणूस धबधब्यात पडले. त्यात पाहिला गंभीर जखमी झाला तर दुसऱ्याच्याच्या फुफुसाला इजा झाली होती मात्र ते दोघेही वाचले होते.

Leave a Comment