तुरुंगाच्या आठवणीने व्याकूळ झाला, पुन्हा चोरी करून तुरुंगात परतला


गुन्हा केल्याचे सिद्ध झाले तर अनेकदा तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. तुरुंगातील जीवन म्हणजे नरक असे मानले जात असले तरी काही जणांना तुरुंगाचे जीवन स्वर्गासारखे वाटते. याचे उदाहरण म्हणजे ज्ञानप्रकाशम ही व्यक्ती. तमिळनाडूची राजधानी चेन्नई मधील पुझहल जेल मध्ये घडलेली ही घटना.

ज्ञानप्रकाशम या ५२ वर्षीय माणसाला चोरीच्या आरोपाखाली या तुरुंगात ठेवले गेले होते. शिक्षा भोगून झाल्यावर तो तुरुंगाबाहेर आला पण तुरुंगाच्या आठवणीने, तेथील जेवणाने आणि शिक्षा भोगत असताना मिळालेल्या मित्रांमुळे तो इतका बेचैन झाला कि शेवटी त्याने पुन्हा एक बाईक चोरी केली, तेथील सीसीटीव्ही मध्ये स्वतःचा चेहरा व्यवस्थित नोंदला जाईल याची काळजी घेतली आणि पोलीस येण्याची वाट बघत तेथेच थांबला. शेवटी पोलिसांनी त्याला अटक करून पुन्हा जेल मध्ये बंद केले.


जेलमधील अधिकारी म्हणाले, ज्ञानप्रकाशमला घरी गेल्यावर कुणी विचारेना. त्याची खाण्यापिण्याची काळजी कुणी घेईना त्यामुळे त्याला तुरुंगाची सारखी आठवण येत होती. एकतर येथे त्याला तू आळशी आहेस असे कुणी म्हणत नव्हते शिवाय नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेळेवर मिळत होते. येथे त्याची काही जणांशी मैत्री जमली होती. त्यांचीही आठवण त्याला बेचैन करत होती. त्यांना भेटण्यासाठी त्याला पुन्हा तुरुंगात यायचे होते.

Leave a Comment