ट्रम्प कन्येचे आलिशान निवासस्थान


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या आणि ट्रम्प यांच्या सल्लागार म्हणून काम करत असलेल्या इव्हंका ट्रम्प न्यूयॉर्क मधून वॉशिंग्टन मध्ये मुक्कामास आल्या त्याला काही दिवस लोटले आहेत. राजधानीत इव्हंका यांनी अलिशान बंगल्यात मुक्काम टाकला असून त्या या घरात त्यांचे पती जेराड आणि तीन मुलांसह राहत आहे. या बंगल्याचे काही फोटो नुकतेच प्रसिद्ध झाले असून या बंगल्याची किंमत ५.५ दशलक्ष डॉलर्स असल्याचे समजते. या बंगल्यात सहा बेडरूम आणि अन्य अलिशान सुविधा आहेत. माजी राष्ट्रपती बराक ओबामा ज्या घरात सध्या भाड्याने राहत आहेत त्यापासून जवळ हा बंगला आहे.

हा बंगला इव्हंका यांनी विकत घेतला कि भाड्याने याबाबत वाद आहेत. हा बंगला १९२३ साली बांधलेला असून त्याचे वारंवार रेनोवेशन केले गेले आहे. हा बंगला डिसेम्बर २०१७ अखेरी विकला गेला तेव्हा ५.५ दशलक्ष डॉलर्सना विकला गेला असून त्याच्या मालकाचे नाव गुप्त ठेवले गेले आहे. इव्हंका वॉशिंग्टन मध्ये येण्याअगोदर न्युयोर्क मध्ये राहत होत्या. त्यांचा फॅशन ब्रांड होता मात्र ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्या राजकारणात अधिक सक्रीय झाल्या आहेत. त्या आणि त्यांचे पती जेराड दोघेही ट्रम्प यांचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. इव्हंका यांनी जेराड यांच्याशी विवाह करताना ख्रिश्चन धर्माचा त्याग करून ज्यू धर्म स्वीकारला आहे. त्यांना अमेरिकेत सध्या फर्स्ट डॉटरचा दर्जा असून ट्रम्प यांच्या परदेश दौऱ्यात त्या अनेकदा सोबत असतात.

Leave a Comment