अशी तयार झाली वर्ल्ड कप ट्रॉफी


आयसीसी वर्ल्ड कप मध्ये १४ जुलै रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होत आहे. यंदाची वर्ल्ड कप ट्रॉफी कुणाला मिळणार याची प्रतीक्षा जगभरातून होत आहे आणि ही ट्रॉफी आपल्या हाती यावी यासाठी इंग्लंड – न्यूझीलंड झुंजतील. पण ही ट्रॉफी कशी बनते याची कथाही मोठी रोचक आहे.

क्रिकेट विश्वकपच्या सुरवातीच्या सहा सिझनमध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या ट्रॉफीज बनविल्या गेल्या होत्या. १९९६ मध्ये नव्या ट्रॉफीचे डिझाईन तयार केले गेले. आत्ताची ट्रॉफी लंडनमध्ये पॉल मोर्सदेन कंपनीने तयार केली असून ती ११ किलो वजनाची आहे. तिची उंची ६५ सेंटीमीटर आहे आणि आत्तापर्यंतच्या सर्व ट्रॉफीज मध्ये ती उंचीने अधिक आहे. सिल्व्हर आणि गोल्ड प्लेटिंग केलेल्या या ट्रॉफीमध्ये एक ग्लोब आहे. तो क्रिकेट बॉलसारखा दिसतो. तीन पिलरवर हा ग्लोब तोलला गेला असून हे तीन पिलर स्टंप्सचे प्रतिक आहेत. त्याखाली एक गोलाकार बेस असून त्यावार विजेत्या टीमचे नाव असेल.

ही ट्रॉफी बनविताना अनेक लोकांची मदत झाली आहे. डिझाईन, ट्रॉफी मेकिंग आणि त्यावरची नक्षी असे त्याचे तीन महत्वाचे पैलू आहेत. डिझाईन मॅनेजर जो एक्लार्क म्हणते, खूप परिश्रम घेऊन हे डिझाईन तयार करावे लागले तेव्हा तिला आजचे स्वरूप आले. यात क्रिकेट खेळाशी संबंधित वस्तू म्हणजे बॉल, स्टंप वगैरे प्रतिक स्वरुपात आहेत. प्रथम कागदावर हे डिझाईन रेखाटले गेले आणि नंतर संगणकावर त्याला अंतिम स्वरूप दिले गेले.

ट्रॉफीला प्लेटिंग करणे हे काम अवघड होते कारण मेटल बॉडी चमकदार बनविणे कष्टाचे काम असते. मेटल मध्ये अनेकदा घाण असते, चरे असतात ते घासून प्रथम गुळगुळीत करावे लागतात आणि नंतर त्यावर प्लेटिंग केले जाते. आत्ताच्या ट्रॉफीमध्ये असलेल्या ग्लोबवर जगाचा नकाशा आहे आणि तो हाताने कोरला गेला आहे. गेली ५० वर्षे या कामाचा अनुभव असलेल्या बेडफोर्ड यांनी हे काम केले आहे.

Leave a Comment