स्वित्झर्लंडमधील बँकातून दडलेला काळा पैसा आणि संबंधित भारतीयांची माहिती देण्यासंदर्भात भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागले असताना आपला काळा पैसा लपविण्यासाठी भारतीयांनी नव्या देशाकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या वर्षभरात द. कोरियात मोठ्या प्रमाणावर असा पैसा जमा झाल्याचे बँक ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्डच्या (बीआयएस) अहवालावरून दिसून आले आहे. या काळात स्वित्झर्लंडमधील बँकातून ठेवण्यात आलेला पैसा मोठ्या प्रमाणावर काढून घेतला गेल्याचेही दिसून आले आहे.
काळापैसा दडविण्यासाठी भारतीयांचा द. कोरियाकडे मोर्चा
या रिपोर्टच्या आकडेवारीनुसार द. कोरियातील बँकेत नॉन बँक डीपॉझीट मध्ये ९०० टक्के वाढ झाली आहे. त्यात कार्पोरेट तसेच वैयक्तिक जमा रक्कम समाविष्ट असून या रकमेचा इंटरबँक ट्रान्झॅक्शन मध्ये समावेश नाही. भारतीयांनी द. कोरियाई बँकामध्ये ९०४ दशलक्ष डॉलर्स ठेवले असून काही वर्षांपूर्वी ही रक्कम फक्त १० लाख डॉलर इतकी होती. केवळ भारतीयच नाहीत तर जगभरातून कोरियन बँकेत पैसे ठेवण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.