आयबीएमचे स्मार्टवॉच, टॅब्लेट आणि फोन म्हणूनही वापरता येणार


अमेरिकेची बलाढ्य टेक कंपनी आयबीएमने नुकतेच स्मार्टवॉच चे पेटंट मिळविले असून या वॉचचा वापर स्मार्टफोन आणि टॅब्लेट म्हणूनही करता येणार आहे. या वॉच साठी कंपनीने २०१६ मध्ये पेटंट मिळावे म्हणून अर्ज केला होता त्याला नुकतीच मंजुरी मिळाल्याचे समजते.

या वॉच मध्ये फोल्डिंग डिस्प्ले दिला गेला असून तो पूर्ण उघडला कि मोठ्या स्क्रीनचा आकार घेतो. त्यात २.३ इंचाचे एकूण आठ फोल्डिंग डिस्प्ले असून स्टँडर्ड कॉन्फिगरेशन प्रमाणे स्मार्टवॉच मध्ये एकच डिस्प्ले आहे आणि बाकी डिव्हाईस मधील छोट्या कप्प्यात फिट केले गेले आहेत. युजर गरजेनुसार हा डिस्प्ले मोठा किंवा छोटा करू शकतो. मोठा स्क्रीन हवा असेल तर सर्व डिस्प्ले ओपन करावे लागतील.

या स्मार्टवॉचचा टॅब्लेट म्हणून वापर करताना सर्व छोटे आठही डिस्प्ले ओपन करता येतील आणि ते वापरण्यासाठी दोन्ही हातांचा वापर करावा लागेल. आयबीएमने २०१६ साली वेअरीबल डिस्प्ले साईझ फॉर इलेक्ट्रोनिक डिस्प्ले डिव्हाइस या नावाने हे पेटंट मागितले होते त्याला ११ जून २०१९ ला मान्यता दिली गेली आहे.

Leave a Comment