विजय माल्ल्याची ‘ती’ याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने देशाबाहेर पळून गेलेल्या कर्जबुडव्या विजय माल्ल्याला दणका दिला आहे. सरकारी यंत्रणांकडून संपत्ती जप्तीची सुरू असलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी करणारी याचिका माल्ल्याने न्यायालयात दाखल केली होती. मात्र ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक घोटाळ्यातील भारताचा फरार आरोपी मद्यसम्राट विजय माल्ल्याला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्याने उच्च न्यायालयात सरकारी यंत्रणांकडून संपत्ती जप्तीची सुरू असलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी केली होती. लंडनच्या न्यायालयाकडून भारतातील बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेल्या मद्यसम्राट माल्ल्याला दिलासा मिळाला होता. त्याने भारतात प्रत्यर्पण करण्याविरोधात केलेली याचिका न्यायालयाने स्वीकारली होती. भारतातील बँकांची ९ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विजय माल्ल्यावर आहे. २०१६ मध्ये भारतसोडून माल्ल्या पळून गेला होता. इंग्लंडकडे त्याच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया भारताने सुरू केली आहे. सध्या माल्ल्या जामीनावर बाहेर असला तरी, त्याचे प्रत्यार्पण अंतिम टप्प्यात आल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment