हिल स्टेशनची राजकुमारी ‘कोडाइकनाल’, पावसाळ्यात नक्की भेट द्यावे असे ठिकाण


दक्षिण भारतातील सर्वोत्कृष्ट हिल स्टेशन पैकी एक म्हणजे ‘कोडाइकनाल’ हे हिल स्टेशन होय. मदुरै शहरापासून 120 किलोमीटर दूर पश्चिम घाटातील पलानी पहाडांमध्ये हे हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात तुम्ही घसरण्याच्या कारणामुळे अथवा अन्य कारणांमुळे हिल स्टेशनला जाणे टाळत असाल तर येथे जाऊन तुमची भिती नक्कीच दूर होईल. पावसाळ्यात या ठिकाणाला बघितल्यावर याच्या आकर्षणापासून वाचणे कठिण आहे. प्रत्येक वातावरणात हे हिल स्टेशन सुंदर दिसत असते. मात्र पावसाळ्यात या ठिकाणी जाण्याची मज्जाच वेगळी आहे. भारतातील सर्वात प्रसिध्द हनिमून स्टेशन पैकी ही एक जागा आहे. शहरी जीवनापासून लांब असे हे हिल स्टेशन 7200 फुट उंचावर आहे. या जागेला ‘हिल स्टेशनची राजकुमारी’ या नावाने ओळखले जाते.

कोकर्स वॉक –
उंच पहाडांमध्ये असलेल्या ठिकाणी चालत जाणे व खालील जमीनीवरील सुंदर दृश्य बघण्याची एक वेगळीच मज्जा असते हे येथे जाऊन तुम्ही नक्कीच अनुभवाल. नेबो पर्वताच्या आजबाजूला 1 किलोमीटरचा पाथ-वे आहे. जेथे लोक चालत फिरताना दिसतात. तेथून खाली सुंदर घाटांचे दृश्य दिसते. तर ढगांबरोबर सेल्फी काढताना अनेक जण दिसतात. कोडाइचे मानचित्र तयार करणाऱ्या लेफ्टिनंट कोकर यांच्या नावावरून या जागेला ‘कोकर्स वॉक’ असे नाव पडले आहे.

सिल्वर कास्केड –
कोडाइकनाल शहरापासून 8 कि.मी.दूर  रस्त्यावर दोन्ही बाजूंनी लागलेल्या गाड्यांची रांग बघून तुम्ही देखील थबकून जाल. मात्र ही गर्दी बाजूलाच असणाऱ्या धबधब्याला बघण्यासाठी आणि त्याबरोबर फोटो काढण्यासाठी झालेली दिसून येते. एक प्रकारे हे कोडाइकनालला पोहचण्याआधी निसर्गाने केलेले स्वगातच आहे. सिल्वर कास्केड नावाच्या या धबधब्याला पाहून असे वाटते की, मोठ्या प्रमाणात चांदी खाली पडत आहे. त्यामुळे याला ‘सिल्वर कास्केड’ नावाने ओळखले जाते.

कुरिंजीची फुले –
कोडाइकनालची शान म्हणजे ‘कुरिंजीचे फुल’ होय. हे फुल प्रत्येक 12 वर्षातून एकदाच दिसते. हे फुल मुरूगन देवाचे पवित्र पुष्प समजले जाते. भगवान मुरूगन यांनी कुरिंजी फुलाची माळा घालून एका शिकारीच्या मुलीशी विवाह केला होता. त्यामुळे या फुलाला प्रेमाचे प्रतिक समजले जाते. हे फुल आल्यानंतर येथे कुरिंजी फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षीच जून ते ऑक्टोंबरमध्ये या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. याचा अर्थ आता हे फुल 12 वर्षानंतर 2030 मध्ये उगवणार आहे.

स्टारफीशच्या आकाराचा झरा –
जर तुम्ही स्टारफीश पाहिली असेल तर स्टारफीशच्या आकारासारखी झील कशी असेल याचा विचार करा. कोडाइकनालचा झरा स्टारफिशच्या आकाराचा आहे. हा झरा एकप्रकारे शहराचे ह्रदयच आहे. येथे बोटिंग करण्याची देखील सोय आहे. याशिवाय झऱ्याच्या आजबाजूला पाच कि.मी. पर्यंत चालण्यासाठी, घोडेस्वारी करण्यासाठी देखील जागा आहे.

कुरिंजी मंदिर –
कोडाइ झऱ्यापासून जवळपास 3 किलोमीटर दूर हे मंदिर आहे. याला शहरातील सर्वात आकर्षण केंद्र समजले जाते. जर तुम्ही कला प्रेमी असाल तर ही वास्तू तुम्हाला नक्कीच आवडेल. हे मंदिर भगवान मुरूगन यांना समर्पित आहे.

ब्रायंट पार्क –
जर तुम्हाला वनस्पती शास्त्रात रूची असेल तर कोडाइ झरण्याजवळील ब्रायंट पार्क तुम्हाला नक्कीच आवडेल. फुलांच्या हंगामात येथे सर्वत्र इंद्रधनुष्याची छटा पसरलेली असते. 1857 चे युकेलिप्स ट्री आणि बोध्दि वृक्ष या पार्कचे प्रमुख आकर्षण आहे. देवधरची झाडे आणि फुलांच्या सानिध्यात या पार्कला बघण्याचा आनंदच काही वेगळा आहे.

ग्रीन वॅली व्यू विरूध्द सुसाइट प्वाइंट –
कोडाइ झीलपासून 5 कि.मी. दूर घनदाट वृक्षांनी अच्छादित या जागेला याच्या बनावटीमुळे सुसाइट प्वाइंट म्हणून संबोधले जाते. येथून तुम्ही दूर पसरलेले ढग आणि धुक्यांचे सुंदर दृश्य अनुभवू शकता.

पिलर रॉक्स –
कोडाइकनाल बस स्टॅडपासून 8 किलोमीटरदूर रॉक्स प्वाइंटवर तुम्ही कधी प्रकृतीचे भयानक रूप बघाल तर कधी मनाला आकर्षित करणारे दृश्यपाहून स्तब्ध व्हाल. येथे 122 मीटरचे तीन उंच स्तंभ आहेत. धुक्यांमुळे ही जागा सुंदर दिसते. तसेच, जवळच एक पार्क देखील बनवण्यात आलेले आहे.

कधी व कसे जाल ?
वर्षातून कोणत्याही महिन्यात या जागेला तुम्ही भेट देऊ शकता. कोडाइकनालपासून 120 किलोमीटर अंतरावर मदुरैचे एअरपोर्ट आहे. कोयंम्बतूर एअरपोर्ट देखील तेथून 170 किलोमीटर आहे. जवळील रेल्वे स्टेशन कोडाइकनालचे आहे. हे रेल्वेस्टेशन 80 किलोमीटर दूर आहे. मदुरैसहित अन्य प्रमुख शहरातील रस्त्यांद्वारे देखील कोडाइकनालला सहज पोहचता येते. तसेच राहण्यासाठी अनेक प्रकारचे हॉटेल्स देखील येथे उपलब्ध आहेत.

Leave a Comment