तुमच्या फोनमध्ये सॅमसंगचे हे अ‍ॅप असेल तर त्वरित डिलीट करा


गुगलने प्ले स्टोरमधून सॅमसंगचा एक अ‍ॅप डिलीट करण्यात आला आहे. प्ले स्टोरवर असलेले Update for Samsung – Android Update Versions या अ‍ॅपमुळे करोडो सॅमसंग युजर्सला धोका निर्माण होत होता.

हा एक बनावटी अ‍ॅप असून, या अ‍ॅपने अनेक सॅमसंग युजर्सला फोन अपडेट करण्यास सांगून पैसे उकळले आहेत. जर तुमच्या फोनमध्ये देखील हे अ‍ॅप असेल तर त्वरित डिलीट करा.

अ‍ॅप डिलीट केल्यानंतर गुगले सांगितले की, युजर्सला सुरक्षितता देणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. तसेच, नेटवर्कचा गैरउपयोग करून युजर्सची माहिती, अथवा लुट करणाऱ्या अ‍ॅपच्या विरोधात आमची धोरणे कडक आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यावर आमच्याकडून त्वरित कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण गुगलने दिले आहे.

या अ‍ॅपचा दावा होता की, हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर स्मार्ट फोनमधील लेटेस्ट सॉफ्टवेअर व्हर्जन अपडेट होईल. या अ‍ॅपवर अपडेटसाठी क्लिक केल्यानंतर ते एका पेजवर घेऊन जाते. त्यानंतर या पेजवर अपडेट करण्यासाठी युजर्सकडून पैसे घेतले जातात.

अँड्रॉइड स्मार्ट फोन्स जुने झाल्यावर अपडेट देणे बंद करतात. जसजसे फोन जुने होत जातात, गुगल अपडेट देणे बंद करते. त्यामुळे अनेक युजर्स गुगल प्ले स्टोरमधून अपडेट करण्याचा प्रयत्न करत असतात.

सिक्युरिटी रिसर्चर आणि मालवेअर विश्लेषक अ‍ॅलेक्सेझ कुरिन्स यांनी सांगितले की, वापरकर्ते अपडेटसाठी अधिकृत प्ले स्टोअरवरच जातात त्यामुळे त्यांना चुकीचे समजणे योग्य ठरणार नाही. कंपन्या अँड्रॉइडमध्ये अनेक सॉफ्टवेअर देतात ज्यामुळे वापरकर्ते गोंधळतात.

माहितीसाठी की, अँड्रॉइड स्मार्टफोन्स अथवा आयफोन अपडेट करण्यासाठी प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर जाण्याची गरज नसते. मात्र अनेक वापरकर्ते अपडेटसाठी अ‍ॅप डाऊनलोड करतात जेणेकरून त्यांची फसवणूक होते. स्मार्ट फोन युजर्स सॉफ्टवेअर अपडेटसाठी सेटिंग्समध्ये जाऊन सिस्टिम अपडेट ऑपशन असतो. तेथून अपडेट करू शकता. प्ले स्टोरमध्ये असलेल्या या अ‍ॅप ला सॅमसंग अँड्रॉइड व्हर्जन अपडेट असल्याचे सांगितले जाते. मात्र या अ‍ॅपचे सॅमसंग कंपनी अथवा सॅमसंग फोनशी काहीही देणे घेणे नाही.

Leave a Comment