या खास द्राक्षांच्या एका गुच्छाची किंमत आहे तब्बल 7.5 लाख रुपये


तुम्ही कधी लाल द्राक्षे खाल्ली आहेत का ? आता तुम्ही म्हणाल की, लाल द्राक्षे असतातच कुठे ? तर खाणार कसे ? द्राक्ष एकतर काळी असतात अथवा हिरवी. मात्र लाल द्राक्ष देखील असतात. ही द्राक्ष सहजासहजी भारतात मिळत नाही.  मात्र या द्राक्षांच्या एका गुच्छाची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

जापानमध्ये या लाल रंगाच्य4 द्राक्षांचा एक छोटासा गुच्छा लोक 7.5 लाख रुपयांना विकत घेत आहेत. या लाल रंगाच्या द्राक्षांना ‘रूबी रोमन’ असे म्हणतात. या खास प्रचातीच्या एका द्राक्षाचे वजन जवळपास 20 ग्राम आहे. एका गुच्छामध्ये 24 द्राक्षे असतात.

एवढ्या मोठ्या प्रमाणात महाग असणाऱ्या या द्राक्षाला ‘श्रीमंताचे फळ’ म्हणून ओळखले जाते. 12 वर्षांपुर्वी या खास द्राक्षांच्या प्रजातीला इशिकावा राज्याच्या  सरकारने विकसित केले आहे. ही द्राक्षे एकदम गोड असतात. या फळाला जापानमध्ये आनंदाच्या क्षणी लोकांना भेट म्हणून देखील देतात. रूबी रोमन द्राक्षी जापानमध्ये सहज मिळत नाहीत, त्यामुळेच त्यांची किंमत एवढी अधिक आहे.

कनाजावा येथील थोक बाजारात या द्राक्षांसाठी विक्रमी बोली लावण्यात आली. लिलावात या द्राक्षांच्या एका गुच्छाला ह्याकुराकुसो नावाच्या कंपनीने 11 हजार डॉलर म्हणजेच 7 लाख 52 हजार रुपयांना विकत घेतले. ही कंपनी जापानमधील हॉटेल व्यवसायाशी संबंधित आहे. सप्टेंबरपर्यंत रूबी रोमन द्राक्षांचे 26 हजार गुच्छे निर्यात करण्याचा निर्णय इशिकावा सहकारी समितीने घेतला आहे.

Leave a Comment