सावधान ! गुगल रेकॉर्ड करत आहे तुमचे खासगी संभाषण


जर तुम्हाला वाटत असेल की स्मार्ट फोन तुमची जासूसी करत नाही तर तुम्ही चुकीचे आहात. कारण तुमच्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून गुगलला तुमच्या बद्दल क्षणक्षणाची माहिती मिळत आहे. स्वतः गुगलने देखील स्विकार केले आहे की, तुमच्या खाजगी गोष्टी रेकॉर्ड करून त्याचे नंतर विश्लेषण केले जाते.
लीक झाली रेकॉर्डिंग्स –
गुगलने मान्य केले आहे की, आर्टिफिशियल इंटेलीजेंस वॉयस गुगल असिस्टेंटच्या माध्यमातून तुमचे बोलणे रेकॉर्ड केले जात आहे. काही दिवसांपुर्वी गुगल असिस्टेंटची डच भाषेमधील काही रेकॉर्डिंग्स पब्लिक ब्रॉडकास्टर वीआरटीवर लीक झाली होती. वीआरटीने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, यातील अनेक रेकॉर्डिंग्सला जाणूनबुजून रेकॉर्ड करण्यात आले होते. तसेच गुगल खाजगी व संवेदनशील गोष्टी देखील ऐकते.
स्मार्ट होम स्पिकर्स आणि सिक्युरिटी कॅमेरे देखील करत आहेत जासूसी –
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, केवळ स्मार्ट फोनमधील एक्टिव वॉयस नाहीतर स्मार्ट होम स्पिकर्स आणि सिक्युरिटी कॅमेऱ्याद्वारे देखील रेकॉर्डिंग केले जाते. गुगल होम स्पिकर्स आणि सिक्युरिटी कॅमेरा तुमचे बोलणे रेकॉर्डकरून त्याची क्लिप सब-कॉन्ट्रॅक्टर्सला पाठवते. त्यानंतर या फाइल्सला ट्रांसक्राइब्सकरून गुगल स्पीच रिकग्नाइजेशनची प्रक्रिया अधिक चांगली होण्यासाठी वापर करण्यात येतो.
गुगलने मान्य केली ही गोष्ट –
गुगलच्या सर्च प्रोडक्ट मॅनेजर डेविड मॅनेसीजने कंपनीच्या ब्लॉग पोस्टद्वारे मान्य केले आहे की, जगभरातील भाषा तज्ञ या रेकॉर्डिंग्स ऐकून भाषेबद्दल गुगलची माहिती वाढवण्यासाठी स्पीच टेक्नोलॉजीच्या विकास करण्यासाठी मदत करतात. भाषा तज्ञ या क्लिप्स ऐकून गुगलची मदत करतात. स्पीच टेक्नोलॉजीवर काम करणाऱ्या प्रोडक्टला बनवण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
1000 पेक्षा अधिक क्लिप्स ऐकल्या –
वीआरटी न्युजने दावा केला आहे की, व्हिसील ब्लोअरच्या मदतीने गुगल असिस्टंटच्या मार्फत 100 पेक्षा अधिक क्लिप्स ऐकल्या आहेत. यामध्ये पत्ता तसेच खाजगी माहितीचा समावेश आहे. या रेकॉर्डमध्ये अश्लिल संभाषण, तसेच नवरा-बायकोमध्ये झालेले भांडण आहे. तसेच एका प्रकरणात एक महिला मदत मागत आहे.
0.2 टक्केच ऑडिओ क्लिप होतात रेकॉर्ड –
गुगलने मान्य केले आहे की, केवळ 0.2 टक्केच ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या जातात. कंपनीचे म्हणणे आहे की, या सर्व क्लिप युजर्सच्या अकाउंटशी जोडलेल्या नसतात. तसेच यामध्ये कोणतीही खाजगी माहिती नसते. तसेच पोस्टमध्ये गुगलने दावा केला आहे की, प्रायव्हेसी लक्षात घेऊन पाठीमागून येणाऱ्या आवाजांना रेकॉर्ड केले जात नाही.
अ‍ॅमेझॉन अलेक्सावर देखील आरोप –
अ‍ॅमेझॉन अलेक्सावर याआधीच संभाषण रेकॉर्ड केले जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मॅचेच्युसेट्समधील एका महिलेने 10 वर्षाच्या मुलीच्यावतीने याबाबत तक्रार दाखल केली आहे.  या तक्रारीमध्ये बेकायदेशीर रित्या लाखो मुलाचे आवाज रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे.  कंपनीने मान्य केले होते की, स्मार्ट डिव्हायझेसमध्ये रेकॉर्ड डाटा डिलीट करण्यात येत नाही.

Leave a Comment