धोनीच्या बाबतीत पाकिस्तानी मंत्र्याचे अपमानास्पद ट्विट


नवी दिल्ली – भारताने विश्वचषक २०१९ मधील उपांत्य फेरीतील सामना १८ धावांनी गमावला. भारताचा पराभव महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या जुंजार खेळीनंतरही झाल्याने भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. अगदी पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेही धोनीच्या या झुंजार खेळीचे कौतूक केले आहे. पण पाकिस्तानी चाहत्यांचा आनंद भारत स्पर्धेतून बाहेर गेल्याने पोटात मावेनासा झाला आहे. धोनीच्या नशिबात अशाप्रकारे अपमान होऊन बाहेर पडणेच होते, असे वादग्रस्त विधान याच पाकिस्तानी चाहत्यांपैकी एक असणारे इम्रान खान यांच्या मंत्रीमंडळातील नेते फवाद अहमद चौधरी यांनी केले आहे.


न्यूझीलंडने भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तान सरकारमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री असलेल्या फवाद यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये पाकिस्तानी लोकांचे नवे प्रेम म्हणजे न्यूझीलंड, असे त्यांनी म्हटले होते. भारताचा पराभव करुन न्यूझीलंडने त्यांना स्पर्धेबाहेर काढण्याने फवाद यांनी आनंदाच्या भरात हे ट्विट केले.


भारतीय ट्विपल्सने फवाद यांच्या या ट्विटवर त्यांचा चांगलाच समाचार घेतला. पण दुसरीकडे पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्या वक्तव्याला समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया ट्विट केल्या. आपल्या बालिशपणाचे प्रदर्शन करत फवाद यांनी त्यांच्या फॉलोअर्सने केलेल्या भारत तसेच धोनी विरोधी ट्विटही रिट्विट करत त्या ट्विटला सहमती दर्शवली आहे. सज्जनांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटला फिक्सींग आणि पक्षपात करुन डाग लावणाऱ्या धोनीला अशाच प्रकारे अपमानजनक निरोप मिळायला हवा, हे ट्विट फवाद यांनी रिट्वीट केले आहे.

Leave a Comment