आता गुन्हेगारांना पकडणे होणार सोपे, गृह मंत्रालय आणणार नवीन प्रणाली


भारतीय गृह मंत्रालय 2020 पासून ऑटोमेटेड फेशियल रिक्गनिशन सिस्टम (एएफआरएस) सुरू करणार आहे. याच्या मदतीने गुन्हेगारांना पकडणे सोपे जाणार आहे. त्याचबरोबर हरवलेली मुल व महिलांना शोधणे देखील सहज शक्य होणार आहे. या प्रणालीला राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो लागू करणार असून, या प्रणालीला क्राइम अन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अन्ड सिस्टम (सीसीटीएनएस) अंतर्गत चालवले जाणार आहे.

सीसीटीएनएस डाटाबेसमध्ये समावेश असणाऱ्या लोकांचा या सॉफ्टवेअरमध्ये समावेश असेल. यामध्ये आरोपी, कैदी, हरवलेले अथवा अनाथ मुले, अज्ञात शव यांची माहिती असेल. या डाटाबेसचा वापर मोजक्याच यंत्रणा करू शकणार आहे. याशिवाय नागरिकांच्या खाजगी माहितीची देखील यात काळजी घेतली जाणार आहे.

सध्या आरोपी अथवा हरवलेल्या व्यक्तीचा फोटो सीसीटीएनएस डाटाशी जुळवला जातो. यामध्ये खुप वेळ जातो. तसेच चुका होण्याची देखील शक्यता असते. एफआरएसमुळे ही प्रक्रिया सोपी होईल. त्यामुळे वेळही वाचणार आहे व ओळख अचूक पटली जाईल.

चेहऱ्याद्वारे ओळख –

एफआरएसमध्ये चेहऱ्यावरील घटकांपासून ओळख पटवली जाते. याची बरोबर येण्याची क्षमता 97 टक्के आहे. या प्रणालीच्या माध्यमातून चेहऱ्यावरील 30 हजार बिंदुंशी जोडले जाऊ शकते.

फॅक्टस –

7.71 लाख गायब झालेल्या नागरिकांची माहिती सीसीटीएनएस आहे. यामध्ये 98 हजार बालकांचा समावेश आहे.

Leave a Comment