विकत घेतलेले घर रिकामे ठेवले म्हणून दीड कोटीचा दंड


कॅनडा मध्ये कायद्याचा एक अजब नमुना अनुभवास आला आहे. व्हँकुव्हर प्रशासनाने चीनी अब्जाधीश जेन झियांग यांच्या पत्नी यीजू यांनी व्हँकुव्हर मध्ये २०१५ साली १४३ कोटी रुपये खर्चून विकत घेतलेले घर रिकामे ठेवले म्हणजे वापरले नाही म्हणून यीजू यांना १ कोटी ४० लाख रुपये दंड ठोठावला आहे. व्हँकुव्हर प्रशासनाने २०१८ पासून रिकाम्या घरांवर होम टॅक्स लागू केला असून त्यानुसार रिकाम्या ठेवलेल्या घरांवर त्यांच्या किमतीच्या १ टक्का दंड आकारण्याची योजना अमलात आणली आहे. यीजू यांना याच नियमानुसार दंड ठोठावला गेला आहे.

यीजू यांनी २०१५ मध्ये बेलमाँट अॅव्हेन्यू मध्ये हे घर विकत घेतले आहे. त्यांचे पती जेन झियांग चीनच्या पीपुल्स नॅशनल कॉंग्रेसचे नेते आहेत. फोर्ब्सच्या अहवालानुसार या दाम्पत्याची एकूण संपत्ती ६४७५ कोटी आहे. युजू यांनी त्यांना ठोठावण्यात आलेल्या दंडाविरोधात ब्रिटीश कोलंबिया सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथे त्यांनी घर रिकामे असले म्हणजे तेथे कुणी राहत नसले तरी त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे असे म्हणणे मांडले आहे.

Leave a Comment