गुजराथच्या महुआ गावात सुरु होतेय पहिले हेल्थ एटीएम


ग्रामीण भागात चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी देशात प्रथमच हेल्थ एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील महुआ या गावापासून या सेवेचा प्रारंभ केला जात आहे. या एटीएमच्या सहाय्याने ४० प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या होऊ शकतात. चाचण्यांचा रिपोर्ट काही वेळातच मिळतो. हे एटीएम इंटरनेटशी जोडलेले असून त्यात मोबाईल, इ मेल वर चाचण्याचा रिपोर्ट देता येतो.

हे एटीएम स्टार्टअप कंपनी योलोने तयार केले आहे. महुआ मध्ये ते प्रायोगिक स्वरूपावर बसविले गेले असून ही सेवा यशस्वी ठरली तर अन्य ग्रामीण भागात ती सुरु होईल. या एटीएम मध्ये बेसिक तपासण्या होतात त्याचबरोबर वजन, रक्तदाब, शरीराचे तापमान, हिमोग्लोबिन, मलेरिया, इसीजी, युरीन, डोळे व त्वचा या संदर्भातील विविध प्रकारच्या ४० तपासण्या होऊ शकतात. ही सुविधा श्यामाप्रसाद मुखर्जी अर्बन हेल्थ योजनेअंतर्गत पुरविली जात आहे असे जिल्हा विकास अधिकारी वरुणकुमार बरनवाल यांनी सांगितले. ते म्हणजे हेल्थ एटीएमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील डॉक्टर पेशंटची माहिती ऑनलाईन वरून मिळवू शकतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment