कर्जफेडीसाठी अनेक कंपन्या विकणार अनिल अंबानी


वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे हैराण झालेले अनिल अंबानी त्यांच्या मुंबईतील कंपनी मुख्यालायासह अन्य कंपन्या विकून कर्जफेड करण्याच्या विचारात आहेत. अनिल अंबानी सध्या ३.२ अब्ज डॉलर्स म्हणजे २२ हजार कोटी रुपये जमविण्याच्या प्रयत्नात असून कर्ज कमी करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहेत असे सांगितले जात आहे. अनिल अंबानी यांच्या डोक्यावर सध्या ९३,९०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या १४ महिन्यात त्यांनी ३५ हजार कोटी कर्जफेड केली असल्याचे समजते.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अनिल अंबानी रिलायंसचे मुंबईतील मुख्यालय, रेडीओ युनिट, म्युच्युअल फंड, रोड प्रोजेक्ट विक्रीच्या तयारीत आहेत. ९ रोड प्रोजेक्टच्या विक्रीतून ९ हजार कोटी, रिलायंस कॅपिटल लिमिटेडच्या रेडीओ स्टेशन विक्रीतून १२०० कोटी, फायनान्शियल बिझिनेस होल्डिंग मोनेटाइज करून ११५०० कोटी मिळविण्याच्या त्यांचा प्रयत्न आहे. एरिक्सन प्रकरणात अनिल अंबानी यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली होती मात्र मोठे बंधू मुकेश यांनी त्यांचे कर्ज फेडून तुरुंगात जाण्यापासून अनिल यांना वाचविले होते. मिळालेल्या माहितीनुसार अंबानी यांनी सर्वाधिक कर्ज स्टेट बँकेकडून घेतले असून रिलायंस होम फायनांस वर १३,१२० कोटींचे कर्ज आहे.

Leave a Comment