इमारतीच्या ५८ व्या मजल्यावर आहे सर्वाधिक लांबीचा स्विमिंग पूल


सिंगापूर हा जगातील निवडक सुंदर देशातील एक. या चिमुकल्या देशात पर्यटकांना आकर्षित करतील अश्या अनेक जागा आहेत. या छोट्याश्या देशाने कमी काळात देशाचा विकास इतक्या सुंदर प्रकारे केला आहे त्यामुळे हा देश जगभरात एक आदर्श उदाहरण म्हणून नावाजला जातो. येथील रस्ते, गगनचुंबी इमारती प्रेक्षणीय आहेतच पण या देशातील स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे.


सिंगापूर मध्ये पर्यटकांसाठी अनेक आकर्षणे आहेत. त्यात ५७ मजली हॉटेलच्या वर असलेला स्विमिंग पूल हे एक नवल आहे. विशेष म्हणजे हा जगातील सर्वाधिक लांबीचा स्विमिंग पूल असून तो १५० मीटर लांबीचा आहे. येथे स्विमिंग बरोबर सनबाथची सुविधा आहे. २५०० रूम्स असलेल्या या हॉटेलच्या छतावर असलेल्या या पुलाच्या किनाऱ्याला खजुराची झाडे असून त्याखाली आराम करण्याची मस्त सोय आहे.


हा पूल १ लाख ९० हजार किलो स्टीलपासून बनविला गेला असून त्यात १४ लाख लिटर पाणी आहे. सुर्यास्ताचा अद्भुत नजारा येथून पाहता येतो. त्यावेळी पुलातील पाणी आणि संपूर्ण वातावरण अतिशय रम्य अश्या सोनेरी रंगात न्हाऊन निघते. या पुलाच्या आकारात ऑलिम्पिक दर्जाचे तीन स्विमिंग पूल बसतात इतका हा पूल मोठा आहे.

Leave a Comment