आठ दशके ऑटो क्षेत्रावर राज्य गाजविलेल्या बीटलला अखेरचा निरोप


फोक्सवॅगन लाईनअप मध्ये गेली आठ दशके म्हणजे ८० वर्षे तयार होत असलेल्या बीटलला बुधवारी अखेरचा निरोप दिला गेला. मेक्सिको येथील कारखान्यात डेनिम ब्ल्यू कलरची शेवटची बीटल तयार केली गेली आणि त्यानंतर तिचे उत्पादन थांबविले गेले. ही शेवटची कार विकली जाणार नाही तर ती कंपनीच्या म्युझियममध्ये ठेवली जाणार आहे.

१९३०च्या दशकात बीटल ही कार प्रथम लाँच केली गेली होती. जगभरात २ कोटी १५ लाख बीटल्स विकल्या गेल्या असून एकट्या अमेरिकेत ५० लाख कार्स विकल्या गेल्या आहेत. १९९८ मध्ये नवी म्हणजे सेकंड जनरेशन बीटल लाँच केली गेली. १९९८ ते २०१० पर्यंत १२ लाख बीटल्स विकल्या गेल्या. त्यानंतर २०११ मध्ये सध्याची म्हणजे थर्ड जनरेशनची बीटल बनविली गेली. आत्तापर्यत या जनरेशनच्या ५ लाख बीटल्स तयार झाल्या आहेत. सेकंड व थर्ड जनरेशन बीटल मध्ये कुपे, कन्व्हर्टीबल अशी दोन्ही मॉडेल बनविली गेली होती.

यामध्ये बीटल २३ रंगात सादर केली गेली होती तसेच ३२ प्रकारची इंटिरियर, १३ वेगवेगळे कॉन्फिगरेशन व १९ स्पेशल एडिशन बाजारात आणल्या गेल्या होत्या. जगभरातील ९१ विविध मार्केट मध्ये बीटल विकली जात होती.

Leave a Comment