12 वर्षाच्या मुलाने लिहिली आहेत तब्बल 135 पुस्तके


उत्तरप्रदेशमधील 12 वर्षीय मुलाने धर्म आणि जीवन अशा विषयांवर आतापर्यंत तब्बल 135 पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनचरित्राचा देखील समावेश आहे.

मृगेंद्र राज नावाच्या या मुलाने वयाच्या 6 व्या वर्षी पासूनच पुस्तके लिहिण्यास सुरूवात केली होती. लेखक म्हणून ‘आज का अभिमन्यु’ हे टोपननाव तो वापरतो. त्याचे नावावर चार विश्व विक्रम देखील आहेत. यामध्ये ‘कमी वयात सर्वाधिक जीवनचरित्र लिहिणारा लेखक’ आणि ‘सर्वात लहान वयात कविता प्रकाशित झालेला लेखक’ यांचा समावेश आहे. वयाच्या सहाव्या वर्षीच त्याच्या कविता प्रकाशित झाल्या होत्या. मृंगेद्र राजने सांगितले की, रामायणांच्या 51 पात्रांचे विश्लेषण केल्यानंतर मी ही पुस्तके लिहिली. माझ्या पुस्तकांची पाने ही 25 ते 100 एवढी असतात. तसेच त्याला लंडनमधील वर्ल्ड युनिवर्सिटी ऑफ रेकॉर्ड्सकडून डॉक्टरेटसाठी देखील ऑफर आली होती.