‘हे’ आहेत बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारे टॉप 10 अभिनेते


हिंदी सिनेसृष्टीला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी देखील म्हटले जाते. कारण या सिनेसृष्टीत कोणाचे नशीब कधी फळफळेल याचा काही नेम नाही. आता हेच बघाना शाहिद कपूर याने आपल्या सिनेकारकिर्दीत कधी नव्हे ते यश कबीर सिंहच्या माध्यमातून मिळवले. त्यानंतर त्याचा भाव वधारला ही बातमी आम्ही तुम्हाला दिलीच होती. त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी चक्क 35 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पण बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत तो काही अव्वल नाही. बॉलीवूड अशाच काही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.


बॉलीवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘भारत’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा गल्ला जमावला. एका चित्रपटासाठी सलमान 60 कोटी रुपये मानधन म्हणून घेतो. सलमान सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.


मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत दुसरा क्रमांक लागतो. सध्या आपल्या आगामी ‘लाल सिंह चढ्ढा’ची तयारी आमिर करत आहे. आमिर एका चित्रपटासाठी तब्बल 45 कोटी रुपये मानधन घेतो.


बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार काही दिवसांपूर्वी बॉटल कॅप चॅलेंजमुळे चर्चेत आला होता. एका चित्रपटासाठी जवळपास 40-45 कोटींचे मानधन अभिनेता अक्षय कुमार घेतो. तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

View this post on Instagram

GOOD NIGHT 😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

A post shared by SRK (@shahrukhkhan_photos_) on


सध्या कोणताही चित्रपट बॉलिवूडचा किंग शाहरुख खानकडे नाही. पण तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. एका चित्रपटासाठी शाहरुख 40 कोटींचे मानधन घेतो.


सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत बॉलीवूडचा हँडसम हंक अर्थात अभिनेता ऋतिक रोशन तो पाचव्या क्रमांकावर आहे. ऋतिक एका चित्रपटासाठी 30-40 कोटी रुपये मानधन घेतो. त्याचा बहुचर्चित चित्रपट सुपर 30 येत्या 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत अभिनेता रणबीर कपूर सहाव्या क्रमांकावर होता. तो एका चित्रपटासाठी 30 कोटी मानधन घेतो. पण त्याला आता शाहिद कपूरने मागे टाकले आहे.

View this post on Instagram

Golden couple ♥ @kajol @ajaydevgn

A post shared by Queen Kajol Turkey @kajol (@queenkajol.turkey) on


एका चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगण 25 कोटी मानधन घेतो. तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.


बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन यांची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. अमिताभ बच्चन एका चित्रपटासाठी ते 20 कोटींचे मानधन घेतात. सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत ते आठव्या क्रमांकावर आहे.


आपल्या आगामी 83च्या चित्रिकरणात अभिनेता रणवीर सिंग व्यस्त आहे. रणवीर एका चित्रपटासाठी 15 कोटींचे मानधन घेतो. सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यामध्ये रणवीरचे नाव घेतले जाते.


सध्या आपल्या ‘सेक्रेड गेम 2’ या वेबसीरिजमुळे अभिनेता सैफ अली खान खूप चर्चेत आहे. हा सीझन येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. एका चित्रपटासाठी सैफ 15 कोटी मानधन घेतो.

Leave a Comment