या आहेत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉलीवूडच्या टॉप 10 अभिनेत्री


स्त्रीप्रधान चित्रपटांची निर्मिती सध्या बॉलिवूडमध्ये केली जात असल्यामुळे बॉलीवूडच्या सिनेतारका आता फक्त हिरोइन पुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर त्यांच्या अभिनयालाही वाव मिळाला आणि प्रमुख भूमिकांमध्येही त्या दिसू लागल्या. परिणामस्वरुप या अभिनेत्रींनी आपल्या मानधनात देखील वाढ केली. आम्ही आज तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच काही अभिनेत्रींबाबत सांगणार आहोत. ज्या आजच्या घडीला सर्वाधिक मानधन घेत आहेत.


बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावतने पत्रकार परिषदेत एका पत्रकाराशी गैरवर्तन केल्यामुळे आणि संपूर्ण मीडियासाठी सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याप्रकरणी तिच्यावर बहिष्कार टाकल्याचे बोलले जात असून ‘एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संघटनेने तिचा आगामी चित्रपट जजमेंटल है क्याला कोणत्याही प्रकारचे कव्हरेज देण्यात येणार नसल्याचे आपल्या पत्रात म्हटले आहे. पण कंगनाचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक लागतो. एका चित्रपटासाठी ती 15 कोटी मानधन घेते.


सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अभिनेत्री दीपिका पादुकोण दुसऱ्या क्रमांकावर आहे. एका चित्रपटासाठी दीपिका 14 कोटी एवढे मानधन घेते. मेघना गुलजारच्या ‘छपाक’ चित्रपटामधून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


बॉलीवूडची देसी गर्ल आणि सध्याच्या घडीला ग्लोबल स्टार असलेली प्रियंका चोप्रा बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. ती लवकरच ‘द स्काय इज पिंक’ मधून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन कमबॅक करणार आहे. प्रियंकाचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिसरा क्रमांक लागतो. एका चित्रपटासाठी ती 13 कोटींचे मानधन घेते.

View this post on Instagram

🌊🌊🌊

A post shared by Kareena Kapoor Khan ღ (@kareenakapoora) on


लवकरच ‘अंग्रेजी मीडियम’मधून अभिनेत्री करिना कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. एका चित्रपटासाठी करिना 11.5 कोटी एवढे मानधन घेते. करिना ‘अंग्रेजी मीडियम’ व्यतिरिक्त ‘गुड न्यूज’ आणि ‘तख्त’ या दोन चित्रपटांमध्येही दिसणार आहे.


सध्या भारत चित्रपटामुळे अभिनेत्री कतरिना कैफ चर्चेत आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत कतरिना पाचव्या क्रमांकावर आहे. एका चित्रपटासाठी ती 11 कोटी रुपये मानधन घेते. कतरिना लवकरच अक्षय कुमार सोबत ‘सूर्यवंशी’मध्ये दिसणार आहे.


बॉलीवूडची फॅशनिस्टा अर्थात अभिनेत्री सोनम कपूर एका चित्रपटासाठी 10.5 कोटी रुपये मानधन घेते. तिचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीमध्ये सहावा क्रमांक लागतो. मात्र बॉक्स ऑफिसवर तिचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपट फारशी चमक दाखवू शकला नाही.


शक्यतो स्त्रीप्रधान भूमिकांना अभिनेत्री विद्या बालन प्राधान्य देते. एका चित्रपटासाठी विद्या 9.5 कोटी रुपये मानधन घेते. ती लवकरच इंदिरा गांधीच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तसेच येत्या 15 ऑगस्टला तिचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

View this post on Instagram

🙃💫☮️🦄❤️

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on


आगामी ‘साहो’ चित्रपटामुळे सध्या सर्वाधिक चर्चेत अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. साउथ सुपरस्टार प्रभास सोबत या चित्रपटात ती स्क्रीन शेअर करणार आहे. एका चित्रपटासाठी श्रद्धा 9 कोटी रुपये मानधन घेते.


क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने कोणताही नवा चित्रपट साइन केलेला नाही. ती त्यामुळे बॉलिवूड सोडणार की काय अशी शंका उपस्थित होत आहे. एका चित्रपटासाठी अनुष्का 8 कोटी रुपये मानधन घेते.


सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री आलिया भट गणली जाते. लवकरच ती अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका चित्रपटासाठी आलिया 7.5 कोटींचे मानधन घेते.

Loading RSS Feed

Leave a Comment