एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी आणला सर्वात स्वस्त प्लान


मुंबई : एकीकडे रिलायन्स जिओ इतर ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्लानची घोषणा करत असतानाच दुसरी देशातील अग्रगण्य कंपनी भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार प्लान आणला आहे. अगदी स्वस्त आणि त्यासोबत आकर्षक ऑफरदेखील हा प्लानसोबत आहेत.

शंभर रुपयांपेक्षा कमी म्हणजे 97 रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेलने आणला आहे. 14 दिवसांची या प्लानची व्हॅलिडिटी आहे. तुम्हाला या प्लानमध्ये 2GB डेटासोबतच अनलिमिडेट कॉलिंग आणि प्रत्येक दिवसाला 100 SMS मोफत मिळणार आहेत. एअरटेलनने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये असाच 97 रुपयांचा प्लान आणला होता. त्यामध्ये 1.5GB डेटा मिळत होता आणि लिमिटेड म्हणजे 350 मिनिटे कॉलिंग मिळत होती. पण आता यात वाढ करण्यात आली आहे.

या संदर्भात एअरटेलच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार सध्या आंध्र प्रदेश, तेलंगना आणि कर्नाटकमध्ये हा प्लान उपलबद्ध आहे. पण एअरटेल जिओप्रमाणे कोणत्याही प्रकारचे थर्ड पार्टी सबस्क्रिप्शन देत नाही. एअरटेलने या प्लानला स्पेशल रिचार्ज-एसटीव्ही कॉम्बो (Special Recharge-STV Combo) असे नाव दिले आहे. त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या प्लानची अधिक माहिती घेऊ शकता.

एअरटेलने याआधी 148 रुपयांचा प्लान आणला होता. आताचा नवा 97 रुपयांचा प्लान काहीसा 148 सारखाच आहे. 148 मध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी 3GB डेटासोबत तुम्हाला या प्लानमध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि प्रत्येक दिवसाला 100 SMS मोफत मिळतात.

Leave a Comment