सौदी अरेबियातील आपला नियोजित कार्यक्रम अमेरिका येथील टॉपची रॅपर आर्टिस्ट निकी मिनाज रद्द केला आहे. महिला आणि गे लोकांच्या हक्कासाठी लाईव्ह परफॉर्मन्स स्वरुपातील कार्यक्रम निकी मिनाज हिने रद्द केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. निकी सौदी अरेबियात होणाऱ्या एका कल्चरल फेस्टिवलमध्ये उपस्थिती दर्शवणार होती. परंतू, ऐनवेळी कार्यक्रम रद्द केल्यामुळे सोशल मीडियावरुन तिच्यावर जोरदार टीका होत आहे. महिला आणि गे समूहाप्रती सौदी अरेबिया हा देश पारंपारिक विचार ठेवतो. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे मिनाजने म्हटले आहे.
यामुळे निकी मिनाजने रद्द केला सौदी अरेबियातील कार्यक्रम
मिनाज हिला एक ओपन लेटर न्यूयॉर्क बेस्ड मानवाधिकार फाउंडेशनने लिहीले होते. फाउंडेशनने या लेटरमध्ये म्हटले होते की, निकी मिनाज हिने या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ नये. सौदी अरबमध्ये महिला आणि गे लोकांवर असलेल्या बंधनांचा विचार करुन तिने या कार्यक्रमावर बहिष्कार घालावा.
दरम्यान, निकी मिनाज हिच्यावर या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यावर चाहत्यांकडून चौफेर टीका होऊ लागली आहे. मिनाज हिने या टीकेनंतर आपली भूमिका व्यक्त केली आहे. यात तिने म्हटले आहे की, सौदी अरेबियातील आपल्या चाहत्यांना मी शानदार परफॉर्मन्स देऊ इच्छित होती. पण, मी हा निर्णय अनेक मुद्द्यांवर विचार केल्यानंतर घेतला की मी या कार्यक्रमात सहभागी न झालेलेच बरे. मला वाटते की, सौदीतील महिला आणि एलजीबीटीक्यू समूहाच्या अधिकारांसाठी आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काला पाठींबा देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.
आपल्या हॉट, बोल्ड आणि वादग्रस्त व्हिडिओजसाठी निकी मिनाज ही प्रसिद्ध आहे. या फेस्टीव्हलचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, मनोरंजनावर गेली अनेक दशके असलेली बंदी सौदी सरकारने हटवल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या फेस्टीव्हलमध्ये उत्सुकता दाखवली होती.