जडेजाचे कौतुक करतानाही संजय मांजरेकरांची कंजुसपणा


न्युझीलंड विरुद्ध झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले असून न्यूझीलंडने या सामन्यात भारतावर १८ धावांनी मात केली. भारतीय संघ २४० धावसंख्येचा पाठलाग करताना केवळ २२१ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताचे दिग्गज फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर झटपट माघारी परतत असताना रविंद्र जडेजाने अर्धशतकी खेळी करत चांगली झुंज दिली. पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.


७७ धावांची खेळी रविंद्र जडेजाने केली. माजी भारतीय खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सामना संपल्यानंतर जडेजाचे कौतुक केले. पण मांजरेकरांनी हे कौतुक करत असतानाही आपला कंजुसपणा दाखवला.


नेटकऱ्यांनी मांजरेकरांच्या या प्रयत्नावर संताप व्यक्त केला असून, जडेजाला चांगली खेळी करुनही डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांजरेकरांना ट्रोल करण्यात आले आहे. संजय मांजरेकर आणि रविंद्र जडेजा यांच्यातील वाद काही दिवसांपूर्वी चांगलाच रंगला होता. वन-डे संघात जडेजासारख्या खेळाडूला मी घेणार नाही, कसोटी क्रिकेट तो चांगले खेळतो असे वक्तव्य मांजरेकर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केले होते. रविंद्र जडेजानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

Leave a Comment