पाळलेले कुत्रेच ठरले भक्षक, मालकाच्या शरीराचे तोडले लचके


कुत्र्यांना सर्वाधिक इनामदार आणि पाळीव प्राणी समजले जाते. लोकांना कुत्र्याला पाळायला देखील आवडते. मात्र तुम्हाला माहित आहे का ? एका घरात पाळलेल्या 18 कुत्र्यांनीच स्वतःच्या मालकाच्या शरीरालाच भोजन बनवले आहे. ही घटना अमेरिकेचे टेक्सासमधील असून, येथे पाळलेल्या 18 कुत्र्यांनीच मालकाच्या शरीराचे लचके तोडले आहेत.

प्राण्यांवर प्रेम करणारे मॅक डलास हे आपल्या 18 पाळलेल्या कुत्र्यांबरोबर राहत होते. एप्रिल महिन्यात ते गायब झाले. नातेवाईक त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केल्यावर हे कुत्रे त्यांना आत येण्यापासून थांबवायचे. नातेवाईक मॅकचा शोध घेऊ न शकल्याने अखेर सुरक्षा एजेंसीने घराची तपासणी घेण्यास सुरूवात केली. त्या वेळी त्यांना जनावरांची विष्ठा आढळली. यामध्ये मनुष्याची केस, कपडे आणि हडकांचे तुकडे आढळून आले. मॅकच्या मृत्याची शंका आल्यावर हडकांचे तुकडे युनिवर्सिटी ऑफ  नॉर्थ टेक्सास सेंटर फॉर ह्युमन रिमेन्समध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. हडकांच्या डीएनएशी मॅकच्या नातेवाईकांच्या डीएनएशी जुळवण्यात आले तेव्हा ते सारखे निघाले.

डीएनए टेस्टनुसार कुत्र्यांच्या विष्ठेमध्ये आढळून आलेले हडकांचे तुकडे हे 57 वर्षीय फ्रेडी मॅक यांचे होते. 18 पाळलेल्या मिश्रित जातीच्या कुत्र्यांनी मॅकचे शरीर, त्याचे कपडे आणि केस खाली होती. रिपोर्टनुसार मॅक यांना आरोग्य संबंधीत आजार होता. मात्र तपासणीत स्पष्ट झाले नाही की, मॅक आजारी असतानी कुत्र्यांनी त्याला मारेल की, त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीराचे लचके तोडले.