दह्यावर लावला 2 रुपये जीएसटी, भरावा लागला 15 हजारांचा दंड


तामिळनाडूमधील तिरूनेलवेली येथील एक आश्चर्यचकित करणारे प्रकरण समोर आले आहे. येथील एका  हॉटेल मालकाने दहीवर जीएसटी घेतल्याने त्याला 15 हजार रुपयांचा दंड बसला आहे. हा दंड तिरूनेलवेली येथील ग्राहक मंचाने लावला आहे.

धारपुरम येथे राहणाऱ्या सी. महाराजा यांनी 6 फेब्रुवारी रोजी अन्नपुर्णा हॉटेलमध्ये 40 रुपयांचे दही खरेदी केले. मात्र हॉटेल मालकाने या दह्यावर 2 रुपये जीएसटी, 1 रुपये एसजीएसटी आणि दोन रुपये पॅकेजिंग चार्ज असे 44 रुपये घेतले. सी. महाराजा यांनी हॉटेल मालकाला सांगितले की, दह्यावर जीएसटी घेतला जात नाही. यावर हॉटेल मालकाने कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये जीएसटी लावण्यात आला आहे असे उत्तर दिले.

सी. महाराजा यांनी याबाबत कमर्शियल टॅक्स विभागामध्ये एसजीएसटीचे असिस्टंट कमिश्नर यांच्याशी देखील चर्चा केली. मात्र कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. यानंतर महाराजा यांनी ग्राहक मंचामध्ये हॉटेल मालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी झाली त्यावेळी संबंधित हॉटेल मालक व अधिकारी देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे मंचाने आपला निर्णय देत हॉटेल मालकाला अतिरिक्त घेतलेले 4 रुपये, मानसिक छळाचे 10 हजार रुपये आणि खटल्यात झालेला खर्च 5 हजार रुपये असे एकूण 15004 रुपयांचा दंड देण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment