‘चिखलफेक’ आंदोलन बाळासाहेबांना नक्कीच आवडले असते : नितेश राणे


सिंधुदुर्ग : उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 समर्थकांना जामीन मंजूर करण्यात असून त्यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर ‘चिखलफेक’ आंदोलन कुणाला आवडो न आवडो बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच आवडले असते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शाब्बास नितेश तू चांगले काम केलेस, असे म्हणत गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांना नितेश यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

दरम्यान, रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात नितेश राणेंसह सर्व आरोपींना प्रत्येक हजेरी लावावी लागणार आहे. नितेश राणे यावर बोलताना म्हणाले की, एक बरे झाले, आता दर रविवारी मला कणकवलीला यायला मिळेल. माझा प्रचार न्यायालयाने सोपा केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, आम्ही काही गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. जोपर्यंत मी आमदार आहे, तोपर्यंत लोकांशी आम्ही बांधील आहोत. आम्हाला लोकांनी यासाठी निवडून दिले आहे. लोकांवर अन्याय होत असताना मी गप्प बसू शकत नाही. उद्यापासून किंबहुना आज या दिवसापासून माझी जबाबदारी सुरू झालेली आहे. माझ्या लोकांवर कुणीही, कुठेही अन्याय करत असेल सर्वात पहिला अन्यायाच्या समोर जाणारा नितेश राणे असेल, असे ते म्हणाले.

शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिला. आंदोलन केले ते योग्यच केले अशी सर्व जुन्या शिवसैनिकांची भावना होती. जे आंदोलन केले ते लोकांसाठी होते. रस्ता बनवायला आता सुरुवात केल्यामुळे आम्ही जिंकलो आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Loading RSS Feed

Leave a Comment