अमेरिकेतील जोर्जिया राज्याची राजधानी अटलांटाच्या हायवेवर अचानक हवेत डॉलर उडू लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले. सहा लेन असणाऱ्या या हायेववर अनेक जण गाड्या बाजूला लावत चक्क नोटा गोळा करू लागले. एवढेच नाहीतर रस्त्यावर डॉलर जमा करण्यासाठी अक्षरशः गर्दी झाली व डॉलर गोळा करण्यासाठी लोक वेडे झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
https://www.nytimes.com/video/us/100000006604886/atlanta-highway-money.html?src=vidm
प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, डॉलर घेऊन जाणाऱ्या एका व्हॅनमधील नोटा अचानक रोडवर उडू लागल्या. कितीतरी वेळ व्हॅनमध्ये बसलेल्या लोकांना याची माहिती देखील नव्हती. तेथून जाणाऱ्या लोकांनी हे दृश्य पाहताच गाड्या बाजूला लावत नोटा गोळा करू लागले. जास्तीत जास्त डॉलर गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
रस्त्यावर उडू लागले लाखो डॉलर, जमा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली
पोलिसांनुसार, निष्काळजीपणामुळे जवळपास 1 करोड 20 लाख रूपये हवेत उडाले. पोलिस व्हिडीओच्या आधारावर लोकांचा तपास करत आहे. जेणेकरून त्यांच्याकडून पैसे परत मिळवता येतील. अनेक लोकांनी स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये येत पैसे जमा केले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, या हायवेवर अशा प्रकारे नोटा उडण्याची ही पहिली वेळ नसून, याआधी देखील दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत. 2004 मध्ये एक व्हॅनच्या अपघातानंतर त्यातील 1 करोड 36 लाख रूपये चोरीला गेले होते. तसेच, 2018 मध्ये व्हॅनचा दरवाजा उघडा राहिल्याने गाडीतील 4 करोड 11 लाख रुपये गायब झाले होते.