2.5 करोड लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये घुसला आहे ‘एजेंट स्मिथ’ व्हायरस


एंड्रॉइड स्मार्ट फोनमध्ये सुरक्षेसंबंधी नेहमीच अडचणी निर्माण होत असतात. एंड्रॉइड फोनमध्ये मालवेअर अथवा व्हायरसचा शिरकाव होत असतो. आता सिक्युरिटी फर्म चेकप्वाइंटने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, जगातील 2.5 करोड एंड्रॉइड फोनमध्ये एजेंट स्मिथ मालवेअरने शिरकाव केला आहे. रिपोर्टनुसार भारतातील 1.5 करोड फोनमध्ये हा व्हायरस आहे. हा व्हायरस एंड्रॉयड फोनमध्ये युजर्सच्या परवानगी शिवाय गेला असून, खास बाब म्हणजे गुगलशी संबंधीत अ‍ॅपच्या माध्यमातून हा फोनमध्ये गेला आहे. हा व्हायरस फोनधील इतर अ‍ॅपला व्हायरस असणाऱ्या अ‍ॅपमध्ये बदलत आहे. हा व्हायरस भारताबरोबरच पाकिस्तान, बांग्लादेश, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या युजर्सच्या मोबाईलमध्ये देखील गेला आहे.

काय करू शकतो हा व्हायरस ?
जर हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये असेल, तर परवानगी शिवाय मोबाईलचा संपुर्ण एक्सेस त्याने घेतलेला असेल. जसे की, कॅमेरा, लोकेशन, कॉल, मॅसेज इत्यादींचा एक्सेस त्याच्याकडे असेल. हा व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये अनेक वित्तीय धोका देणाऱ्या जाहिराती दाखवत असेल. या जाहिरातींच्या मदतीने हा व्हायरस तुमची आर्थिक माहिती चोरू शकतो. या अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे याचा आयकॉन दिसत नाही. त्यामुळे हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये आहे की नाही याबद्दल तुम्हाला समजणारच नाही. हे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलसारखे अ‍ॅप बदलू शकतो.

थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने फोनमध्ये शिरकाव –
याच बरोबर हा अ‍ॅप प्ले स्टोरमधून काढून टाकलेला 9Apps सारखे अ‍ॅप आपोआप डाऊनलोड करतो. या अ‍ॅपला डाऊन केल्यानंतर त्यासंबंधीत फ्री गेम्स, फ्री ऑफर्स सारख्या जाहिराती दिसतात. 9Apps सारखे डाऊनलोड झालेले अ‍ॅपमध्ये आधीच व्हायरस असतात. जर तुमच्या फोनमध्ये whatsapp, lenovo.anyshare.gps, mxtech.videoplayer.ad, jio.jioplay.tv, jio.media.jiobeats, jiochat.jiochatapp, jio.join, good.gamecollection, opera.mini.native, startv.hotstar, meitu.beautyplusme, domobile.applock,touchtype.swiftkey, flipkart.android, cn.xender, eterno आणि truecaller सारखे अ‍ॅप असतील तर, कदाचित एजेंट स्मिथ व्हायरसने तुमच्या फोनमध्ये शिरकाव केलेला आहे.

फोनमधून कसे हटवाल या व्हायरसला ?
फोनच्या सेटिंग्समध्ये जा.
अ‍ॅप्स अथवा अप्लिकेशन मॅनेजरवर क्लिक करा.
खाली स्क्रोल करून बघा.
आता त्यानंतर असा कोणताही अ‍ॅप असेल जो तुम्हाला माहित नाही अथवा तुम्ही डॉउनलोड केलेला नाही त्याला अनइंस्टॉल करा.
जर कोणताही दुसरा अ‍ॅप आढळला तर नुकताच इन्स्टॉल केलेला अ‍ॅप डिलीट करून टाका.

Leave a Comment