टेक्नो फँटम ९ स्मार्टफोन लाँच


चीनी मोबाईल कंपनी टेक्नो मोबाईलने त्यांचा नवा मोबाईल टेक्नो फँटम ९ भारतात सादर केला आहे. या फोनची किंमत १४९९९ रुपये आहे. तो १७ जुलाई पासून फ्लिपकार्टवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. या फोनला इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, एआय फेस अनलॉक फिचर दिले गेले आहे.

या फोनला ६.४ इंची फुल एचडी एमोलेड डॉट नॉच डिस्प्ले दिला गेला आहे. अँड्राईड ९ पायवर आधारित एचआयओएस ५.० वर तो रन करतो. ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज असून एसडी कार्डच्या मदतीने ते २५६ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. फोनसाठी रिअल ट्रिपल कॅमेरा सेट असून कॅमेरे १६, ८ व २ एमपीचे आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनला दोन सीम आणि एक एसडी कार्ड वापरता येणार आहे.

Leave a Comment