इस्रायलमधली मजेदार मड रेस


जगभरात जेवढे म्हणून देश आहेत तेथेतेथे विविध सण, उत्सव साजरे करण्याच्या विविध प्रथा आहेत. इस्रायल मध्ये दरवषी मड रेस हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यात १० किमी लांबीचा अनेक अडथळे असलेला चिखलाचा रस्ता तयार केला जातो आणि त्यात सामील झालेले नागरिक रेस करतात. यंदाच्या वर्षी या उत्सवात ६ हजार लोक सहभागी झाले होते.


हा रस्ता तीन भागात विभागलेला असतो. पहिल्या भागात १८ अडथळे असतात. तीव्र उतार, कमरेपर्यंत चिखलाचे पाणी असलेला भाग, एका जागी बॅरीअर म्हणून टायर ठेवलेले असतात. काही लोक हे टायर उड्या मारून ओलांडतात तर काही चक्क टायरच्या खालून जातात. चिखलात बरबटलेले असूनही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य असते.


रेसची सुरवात प्रत्येकजण स्वतंत्रपणे करतो पण एक मेका साह्य करू शिवाय पर्याय नाही हे लवकरच लक्षात येते आणि मग सहभागी लोकांच्या तेथेच टीम बनतात. रस्त्यात इतका चिखल आणि घसरडे असते कि बूट वारंवार साफ करावे लागतात. तीव्र उतार अथवा चढण एकमेकांना धरून, खेचून पार केली जाते. शेवटच्या टप्प्यात फिनिश पॉइंट समोर दिसत असतो पण त्यापूर्वी शेवटचा चिखलाच्या पाण्याने भरलेला तलाव पार करावा लागतो. अतिशय मौज मजेत हा उत्सव साजरा केला जातो आणि त्यात महिला पुरुष मोठ्या संख्येने सामील होतात.

Leave a Comment