अपघातात पाय तुटला आणि हॉस्पिटल मध्ये डोके फुटले


नशिबाचा फेरा कुणाला काय भोगायला लावेल हे सांगणे कठीण. उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे राहणारे रामू यादव सध्या हा अनुभव घेत आहेत. झाले असे कि त्यांना गेल्या आठवड्यात रस्त्यात अपघात झाला आणि त्यांचा पाय मोडला. ते हॉस्पिटल मध्ये भरती झाले तेव्हा त्यांच्या पायाला प्लास्टर करण्यात आले. इथपर्यंत सगळे ठीक होते पण दुर्दैव असे कि रामू ज्या बिछान्यावर झोपले होते तेथे अचानक खोलीच्या छताचे प्लास्टर पडले आणि रामू यांचे डोके फुटले.

गोराखपुरच्या जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली तेव्हा तातडीने नर्सने त्यांना आयसीयु मध्ये हलविले. त्यांच्या डोक्याची तपासणी करून त्यांच्यावर उपचार झाले. विशेष म्हणजे खोलीच्या छताचे प्लास्टर कोसळले तेव्हा ते पाहून खोलीत असणारी सर्व माणसे सुरक्षेसाठी बाहेर पळाली पण रामू यांच्या पाय प्लास्टर मध्ये होता आणि कॉटला तो बांधलेला होता त्यामुळे प्लास्टर पडते आहे हे कळूनही ते कॉटवरून हलू शकले नाहीत. प्लास्टरचा मोठा तुकडा प्रथम कॉटच्या दांडीवर आपटून सरळ रामू यांच्या डोक्यावर आदळला असे समजते. त्यामुळे ४५ वर्षीय रामू यादव यांच्यावर पायाप्रमाणे डोक्यावर उपचार घेण्याची वेळ आली.

Leave a Comment