वरूण-सारा थिरकरणार गोविंदा-करिश्माच्या ‘या’ गाजलेल्या गाण्यावर


बॉलिवूडमध्ये चित्रपटांचे रिमेक साकारण्याचा ट्रेन्ड अलिकडे सुरू आहे. अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांची बॉलिवूडमध्ये एककाळ गाजवलेली जोडी होती. चाहत्यांनी त्याकाळी या जोडीला चांगलेच डोक्यावर घेतले होते. त्याचबरोबर ९०व्या दशकातील या जोडीच्या चर्चा आज सुद्धा चांगल्याच रंगतात. बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट या जोडीने दिले आणि ते हीट देखील ठरले.

प्रेक्षकांनी त्याकाळी ‘कुली नं.१’ चित्रपटातील ‘मैं तो रस्तेसे जा रहा था’ या गाण्याला चांगलेच डोक्यावर घेतले होते. हे गाणे आता देखील वाजले की चाहत्यांचे पाय या सुपरहीट गाण्यावर ताल धरू लागतात. त्यामुळे पुन्हा एकदा हे गाणे चाहत्यांच्या भेटीस आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. हटके अंदाजात गोविंदा-करिश्माच्या या गाण्याला चाहत्यांसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर नव्याने निर्माण होणाऱ्या गाण्यामध्ये गोविंदा-करिश्मा ऐवजी अभिनेता वरूण धवण आणि अभिनेत्री सारा अली खान झळकणार आहे.

इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार तनिष्क बागची ‘मैं तो रस्ते से जा था’ या गाण्याला संगीतबद्ध करणार आहेत. शिवाय ५ ऑगस्टपासून बँकॉक येथे ‘कुली नं १’ चित्रपटाच्या रिमेकचे चित्रीकरण सुरू होणार आहे. चाहत्यांनी ज्याप्रमाणे गोविंदा-करिश्माच्या जोडीला डोक्यावर घेतले होते, त्याचप्रमाणे वरूण-सारा ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस पडते की नाही हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment