उल्का पिंडापासून तयार केलेल्या दोन पिस्तुलांचा होणार लिलाव


10 कोटी रुपयांची बोली अमेरिकेतील डलासमध्ये लिलावात असणाऱ्या दोन पिस्तुलांसाठी लावण्यात आली आहे. 4500 कोटी जुन्या उल्का पिंडापासून ही दोन्ही पिस्तुल तयार करण्यात आली आहेत. विशेषज्ञांनुसार, म्योनियोनॉलुस्टा पृथ्वीवर पडलेल्या सगळ्यात पहिल्या उल्का पिंडांपैकी एक आहे. 20 जुलैला अमेरिकेचे हॅरिटेज ऑक्शन हाऊस हा लिलाव करेल.

1906 साली म्योनियोनॉलुस्टा उल्कापिंडला स्वीडनमध्ये शोधले होते. या उल्कापिंडीपासून पिस्तुल बनवण्यात आली होती. लिलावाची तयारी पूर्ण झाली असून या पिस्तुलांची सुरुवातीची किंमत 6 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना लिलाव हाउसच्या सायंस-नेचर डिपार्टमेंटचे डायरेक्टर क्रॅग किसिकने सांगितले की, उल्कापिंडापासून या पिस्तुलाचा बहुतेक भाग तयार करण्यात आला आहे. पिस्तुलाच्या सेटला लिलाव हाउसच्या ऑफिशिअल वेबसाइटवर दोन्ही वेगळे दाखवण्यात आले आहे. पिस्तुलांच्या वैशिष्ट्येबाबत लिहिण्यात आले आहे की, 1911 च्या लोकप्रिय कोल्ट पिस्टलप्रमाणे याला तयार करण्यात आले आहे. हे पिस्तुल बनवणारे लोई बियोन्दू यांनी सांगितले की, या पिस्तुलाला बनवणे एक वेगळाच अनुभव होता. पिस्तुल तयार करताना असे वाटत होते की, जसे काय मी कार्बन स्टील, अॅल्युमीनियम आणि स्टीलमध्ये हिरे मिसळत आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment