योग्य कपडे घातले नसल्याचे सांगत महिलेला विमानातून उतरवले


ह्युस्टन येथील महिलेबरोबर एक वेगळीच घटना घडली आहे. एका महिलेला तिने घातलेले कपडे योग्य नसल्याचे सांगत तिला व तिच्या 8 वर्षांच्या मुलाला अमेरिकन एअरलाईन्सने विमानातून खाली उतरवण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना 30 जूनची असून, महिलेला स्वतःला झाकून घेण्यास सांगण्यात आले, तरच तिला प्रवास करता येईल असे सांगण्यात आले.

या प्रकारानंतर अमेरिकी एअरलाईन्सचे प्रवक्ते शनॉन गिल्सन म्हणाले की, कंपनीने प्रवासाचे पुर्ण पैसे परत केले आहेत. मात्र विमानातून उतरवलेल्या महिला प्रवाश्याने सांगितले की, तिला कोणतेच पैसे परत देण्यात आलेले नाहीत. तिसा रोवे नावाची ही महिला मेडिकल फिजीशियन आहे.

ती महिला व तिचा मुलगा जमैकामध्ये एक आठवडा राहिल्यानंतर अमेरिकेला परत येत होते. जेव्हा ती महिला किंग्सटन एअरपोर्टवर पोहचली तेव्हा ती पुर्णपणे घामाने भिजलेली होती. त्यामुळे बोर्डिंगच्या आधी ती सुकण्यासाठी बाथरूममध्ये गेली.तिने सांगितले की, मी स्वतःला पाहिले तेव्हा मला माहित होते मी समोरून आणि मागून कशी दिसत आहे. त्यानंतर ती महिला मुलाबरोबर विमानात बसण्यासाठी गेली. मात्र विमानातील एक महिला अटेंडेटने तिला बोलण्यासाठी बाहेर घेऊन गेली.

अटेंडेटने महिलेला विचारले की, तुमच्याकडे जॅकेट आहे का जर नसेल तर तुम्ही या कपड्यांमध्ये विमानामध्ये जाऊ शकत नाही. रोवे यांनी सांगितले की, यात्रेच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून मी त्यांच्याकडे शाल मागितली. मात्र अटेंडेट वारंवार हेच सांगत होती की, स्वतःला झाकल्याशिवाय विमानात जाऊ शकत नाही. त्यानंतर ती महिला व मुलगा त्यांच्या सीटवर बसले. मात्र रोवे यांच्या मुलाने शालने चेहरा झाकत रडू लागला.

रोवे यांनी ट्विटवर यासंबंधीत फोटो देखील शेअर केला. त्यांनी लिहिले की, मी प्रवासाच्या वेळी हेच कपडे घातले होते. त्यामुळे मला अमेरिकन एअरलाईन्सने विमानातून खाली उतरवले होते. कोणत्या कारणामुळे मला स्वतःला झाकून प्रवास करण्यास सांगण्यात आले ? मला धमकावण्यात आले की, स्वतःला झाकून घ्या तरच तुम्हाला प्रवास करता येईल. त्यामुळे मला शालने स्वतःला झाकून घेत प्रवास करावा लागला.

Leave a Comment