आपल्या व्याजदरात स्टेट बॅक ऑफ इंडियाने केली कपात


मुंबई :आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दोन दिवसांपूर्वी बँकांना रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली असल्याचे बजावले होते. ग्राहकांना त्याचा फायदा बँकांनी दिला पाहिजे. देशातील सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने या आवाहनानंतर आपल्या ग्राहकांसाठी एसीएलआरमध्ये ०.०५ ने कपात केल्यामुळे कर्ज स्वस्त झाली आहेत. आपल्या व्याजदरात स्टेट बॅक ऑफ इंडियाने कपात केल्यामुळे गृह कर्ज, कार आणि व्यक्तिगत कर्ज आजपासून स्वस्त झाले आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर आपल्या कर्जाच्या व्याज दरात स्टेट बँकेने कपात केल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाचा कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

०.०५ टक्क्यांनी कर्जाच्या व्याजदरात स्टेट बँक ऑफ इंडियाने कपात केली आहे. आज बुधवारपासून नवीन व्याजदर हे लागू झाले आहेत. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ६ टक्क्यांवरुन ५.७५ टक्क्यांवर आणल्यानंतर स्टेट बँकेने सर्व मुदतीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला. स्टेट बँकेने वर्षभराचा किमान व्याज दर ८.४० टक्के इतका झाला आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेने तिसऱ्यांदा व्याज कपात केली आहे. त्यामुले १० एप्रिलपासून गृहकर्जाचे व्याज दर ०.२० टक्क्यांनी केमी झाले आहेत.

Leave a Comment