आरआरआरच्या दोन्ही नायकांच्या एंट्रीसाठी तब्बल 40 कोटी रुपयांचे बजेट


बाहुबली सीरिजच्या चित्रपटांद्वारे देशातील प्रत्येक सिनेरसिकांच्या मनात घर निर्माण केले दिग्दर्शक एसएस राजमौली यांच्या आगामी आरआरआर हा चित्रपट दिवसेंदिवस वेगवेगळे विक्रम बनवत आहे. स्वातंत्र्यसैनिक अल्लूरी सीताराम आणि कोमाराम भीम यांच्यावर आधारित चित्रपटात अल्लूरी सीताराम यांच्या भूमिकेत राम चरण आणि कोमाराम भीम यांच्या भूमिकेत जूनियर एनटीआर दिसणार आहेत.

चित्रपटात अजय देवगनची खास भूमिका आहेच, त्याचबरोबर आलिया भट्ट राम चरनच्या अपोझिट सीता या भूमिकेत दिसणार आहे. राजमौली यांनी नुकताच राम चरनच्या एंट्रीचा सीन शूट केला. त्यासाठी तब्बल 15 कोटींचा खर्च करण्यात आला आहे, तर आता जूनियर एनटीआरची एंट्रीच्या सीनची वेळ आली आहे.

सुत्रांनी सांगितले की आरआरआरमधील राम चरनच्या एंट्रीचा सीन हा खुप भव्यदिव्य असेल. या एंट्री सीनसाठी राजमौली यांच्या टीमने 25 कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. देशाचा हा पहिलाच चित्रपट असेल ज्यात केवळ दोन सीनसाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

एवढ्या बजेटमध्ये, दोन चांगले चित्रपट बनले जाऊ शकतात. राजामौली यांनी त्यांच्या टीमसोबत आतापर्यंत हैदराबाद, गुजरात आणि पुणे येथे चित्रपटाचे शूटिंग केले आहे. चित्रपटाची कथा स्वातंत्र्यापूर्वी 1920 च्या दशकातील आहे.

अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांनी ब्रिटीशांविरोधात लांबलचक लढा दिला होता आणि आरआरआरच्या माध्यमातून पुढील वर्षी 20 जुलै रोजी ही कथा मोठ्या पडद्यावर सादर होणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगूसह हिंदी भाषेत देखील रिलीज केला जाणार आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment