1700 किलोमीटर प्रवास करून क्रीमियात पोहचले सोलर विमान


येवपाटोरिया- सोलर बॅटरीने उडणारे विमान लेतायुस्चाया लॅबोरेटोरियावर (फ्लाइंग लॅब) रशियात अनेक वर्षांपासून काम सुरू होते. या विमानाने आता आपले पहिले उड्डाण घेतले आहे. या विमानाला 1700 किलोमीटर उडवून मास्कोवरून क्रीमियाला नेण्यात आले.

2021 मध्ये या विमानात संपूर्ण जगाची सैर करण्याचा विचार या विमानाचे पायलट फ्योडोर कोनियुकोव करत असून त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर याच्या प्रोडक्शन मॉडलवर काम सुरू होईल. या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या टीमचा दावा आहे की, हे विमान लवकरच न थांबता संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा लावण्यास सक्षम असेल. हे विमान सात दिवसांत आपोआप सौर उर्जेवर चार्ज होईल.