एकदा चार्ज केल्यावर 452 किलोमीटर चालते ही कार


ह्युंडाई कोना ही कार भारतात नुकतीच लाँच झाली आहे. ही एक इलेक्ट्रीक एसयुवी कार आहे. या कारची किंमत 25.30 लाख आहे. ही एक्स शो रूम किंमत असून, नंतर या कारची किंमत वाढणार आहे. या इलेक्ट्रीक एसयुवी कारची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ही कार एक तासातच पुर्ण चार्ज करु शकता. मात्र यासाठी 50 केव्हॉल्ट डीसी चार्जरची आवश्यकता आहे.

या कारला स्टॅंर्ड एसी सोर्सने चार्ज केले तर पुर्ण कार चार्ज होण्यासाठी 6 तास 10 मिनिटे लागतील. या कारमध्ये तीन ड्राइव मोड आहेत इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट. गियरबॉक्सबद्दल सांगायचे तर हे वन स्पीड ऑटोमेटिक आहे आणि यामध्ये मॅन्युअल सिस्टिम नाही.

कंपनी या बरोबर एक होम चार्ज देखील देणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांसाठी डिलरशीपमध्ये चार्जिंग स्टेशन लावले जाणार आहेत. भारतातील चार मोठ्या शहरात इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर देखील चार्जिंग स्टेशन लावले जातील जेथे ही कार चार्ज केली जाऊ शकेल. कंपनीचा दावा आहे की, कार एकदा पुर्ण चार्ज केल्यानंतर 452 किलोमीटर पर्यंत चालू शकते.

कारच्या समोरील गोष्टींबद्दल सांगायचे तर, येथे एलईडी डेटाइम रनिंग लाइट मिळते. याचबरोबर माउंटेड हॅडलॅप्स आहेत. ग्रिल ह्युंडाईच्या दुसऱ्या एसयुवी सारखेच आहे. मात्र ते मार्डन वाटते.

कारला 100 केडब्ल्यु चे इंजिन देण्यात आले आहे. तसेच हे फ्रंट व्हिल ड्राइव असेल. हे 131 bhp एवढे पॉवर देते. कंपनीचा दावा आहे की, केवळ 9.7 सेंकदामध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रती तासाचा वेग पकडू शकते.

कारच्या इंटेरियरबद्दल सांगायचे तर, ड्राइविंग मोड सोबतच 8 इंचची फ्लोटिंग टचस्क्रीन इनफोटेनमेंट सिस्टम देण्यात आलेली आहे. मोबाईल फोन चार्जिंगसाठी वायरलेस चार्जिंगचा देखील पर्याय आहे. याच बरोबर अपल कार प्ले आणि अड्राईड ऑटो सारखे फिचर्स देखील आहेत. सीट लेदरची असून, इलेक्ट्रिक सनरुफ आहे. तसेच इलेक्ट्रिक पावर ब्रेक देखील आहेत.

सुरक्षेसाठी कारमध्ये ABS बरोबर EBD देखील देण्यात आले आहे. याचबरोबर यात एअरबॅग्स देखील आहेत. हिल ऐसिस्ट, डिस्क ब्रेक, वर्चुअल इंजिन साउंड सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्टेब्लिटी कंट्रोल सारख्या गोष्टी सुरक्षित बनवतात.

कंपनी याचबरोबर तीन वर्षांची अनलिमिटेड वॉरटी देखील देते. सध्या भारतात इलेक्ट्रिकल कार वापरण्याचे प्रमाण खुप कमी आहे. सध्या या कारला टक्कर देणारी एकही एसयुवी भारतीय बाजारात नाही. नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये इलेक्ट्रिकल कारवर लोन स्वस्त झाले आहे. त्यामुळे भारतात या कारची किती प्रमाणात विक्री होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Leave a Comment