ऋतिकच्या सुपर 30ला सेन्सॉर बोर्डाची कात्री


मागील खूप काळापासून अभिनेता ऋतिक रोशनचा आगामी ‘सुपर 30’ चित्रपट खूप चर्चेत आहे. गणित तज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सेन्सॉर बोर्डाने ‘U’ सर्टिफिकेट देत या चित्रपटाला हिरवा कंदिल दाखवला असला तरीही त्यांनी काही बदलही या चित्रपटात सुचवले आहेत. सेन्सॉर बोर्डाने रिलीजसाठी अवघे दोन दिवस उरले असताना सुचवलेल्या काही बदलांमुळे हा चित्रपट आता अडचणीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही संवादांवर आक्षेप घेत ते संवाद काढून टाकण्यास सांगितले आहे.

‘सुपर 30’च्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील रामायणाचा उल्लेख करण्यात आलेला एक संवाद काढून टाकण्यास सांगितले. सेन्सॉर बोर्डाच्या सुचनांशी निगडीत सर्व माहिती त्यांच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. यानुसार एका संवादात रामायण या शब्दाला राज पुरम हा शब्द वापरला असल्याचे सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आल्यामुळे हा संवाद काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. तसेच चित्रपटातील एका सीनमध्येही काही बदल करण्यास सांगितले गेले आहेत. एक मंत्री बार डान्सरला पोटाला स्पर्श करताना एका सीनमध्ये दाखवण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाने ज्यावर आक्षेप घेतला आहे. याशिवाय या चित्रपटातील गाण्यामध्ये अँटी लिकर डिसक्लेमर दाखवण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने दिली आहे.

Leave a Comment