या आयलँडवर केवळ महिलांनाच मिळतो प्रवेश


तुम्ही कधी अशा जागेबद्दल ऐकले आहे का जेथे फक्त महिलांनाच प्रवेश दिला जातो. नाही ना! मात्र आम्ही तुम्हाला अशा जागेबद्दल सांगणार आहोत, जेथे पुरुषांना जाण्यास बंदी आहे. या जागेवर केवळ महिलांनाच एंट्री आहे. या जागेचे नाव सुपरशी आयलँड आहे. ही जागा फिनलँडच्या बाल्टिक सीच्या जवळ आहे. या आयलँडला याच वर्षी सुरुवात करण्यात आली आहे. 8.47 एकरमध्ये पसरलेल्या या आयलँडला अमेरिकन महिला उद्योगपती क्रिस्टीना रॉथने विकत घेतले आहे.

क्रिस्टीना रॉथ अशा जागेच्या शोधात होत्या, जेथे महिलांना आरामात सुट्ट्या घालवता येतील. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यांचे म्हणणे आहे की, या आयलँडवर महिलांसाठी फिटनेस, न्युट्रीशन आणि बाकी त्या सर्व गोष्टी आहेत, ज्या महिलांना रोजच्या धावपळीच्या जीवनात मिळत नाही.

सुपरशी आयलँडमध्ये एक रिजॉर्ट आहे. ज्याचे काम सध्या सुरू आहे. या रिजॉर्टमध्ये 4 कॅबिन असतील आणि या कॅबिनमध्ये 10 महिले व्यवस्थित राहू शकतात. रिजॉर्टमध्ये स्पा, बाथ सारख्या सर्व सुविधा असतील. सर्व केबिन आरोग्याचा विचार करुनच बनवण्यात येत आहेत. येथे एका कॅबिनची किमत 2 लाखापासून ते 4 लाखापर्यंत असणार आहे. यामध्ये महिला येथे 5 दिवस आरामात राहू शकतील.

या आयलँडवर जाण्यासाठी तिकीट काढण्याआधी महिलांना स्काइपद्वारे मुलाखत द्यावी लागेल. क्रिस्टीना रॉथ म्हणाल्या की, मला पुरूषांचा कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. पुढे जाऊन हे आयलँड पुरूषांसाठी देखील उघडले जाईल. मात्र सध्या हे केवळ महिलांसाठीच उघडण्यात आले आहे.

Leave a Comment