व्हिडीओ व्हायरल, हातात दारु आणि बंदुका घेऊन भाजप आमदाराचा डान्स


नवी दिल्ली – बेशिस्त आणि गैरवर्तवणुकीमुळे भाजपमधून निलंबित असलेले उत्तराखंडमधील वादग्रस्त भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पिअन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पण ते यावेळी चर्चेत येण्यामागे हातात दारु आणि बंदूक घेऊन बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केल्याचे कारण आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

प्रणव सिंह व्हायरल झालेल्या व्हिडीओत हातात बंदूक घेऊन नाचताना दिसत आहेत. ते यावेळी अश्लिल भाषेचा वापर करत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव सिंह पायाचे ऑपरेशन यशस्वीपणे पार पडल्यानंतर आपल्या घरी परतले होते. याचाच आनंद आपल्या समर्थकांसह ते साजरा करत होते. प्रणव सिंह यांनी नाचताना एक, दोन नाही तर चार बंदुका हातात घेतल्या होत्या.

त्यांचे समर्थकही यावेळी कौतुक करताना ऐकू येत आहे. फक्त तुम्हीच उत्तराखंडमध्ये हे करु शकता असे ते म्हणत आहेत. आपल्या समर्थकांना उत्तर देताना फक्त उत्तराखंड नाही, तर संपुर्ण भारतात असे कोणी करु शकत नाही असे म्हणतात.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव सिंह यांच्या व्हिडीओची भाजपने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांच्यावर सध्या तीन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चर्चा करुन काय कारवाई करता येईल यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment