आयबीएम करणार जगातील सर्वात मोठी डील, रेड हॅटला खरेदी करणार


कधीकाळी मॅनफ्रेम कंप्यूटिंगसाठी प्रसिध्द असणारी अमेरिकन कंपनी इंटरनॅशनल बिजनेस मशीन (IBM) क्लाउड कंप्युटिंग टेक्नोलॉजीला घेण्यासाठी आयटी सेक्टरमध्ये जगातील सर्वात व्यवहार करणार आहे. आयबीएम 34 अरब डॉलरमध्ये रेड हॅटला विकत घेणार आहे. आयबीएमच्या 108 वर्षांच्या इतिहासात हा सर्वात मोठा व्यवहार असणार आहे. या व्यवहारामुळे आयबीएमची क्लाउड कंप्युटिंगच्या व्यवसायात झपाट्याने वाढ होणार आहे.

रेड हॅट ही कंपनी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमची एक्सपर्ट कंपनी आहे. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम हे एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. जे सध्या सर्वाधिक प्रचलित आहे. अनेक जण मायक्रोसॉफ्टला पर्याय म्हणून या सॉफ्टवेअरचा वापर करतात.

आयबीएमचे रेड हॅटला विकत घेणे हेच दर्शवते की, आयबीएम आता पारंपारिक हार्डवेअर प्रोडक्ट पेक्षा आता बजाय क्लाउड, सॉफ्टवेअर आणि सर्विसेज सेगमेंटवर लक्ष केंद्रित करणार आहे. आयबीएमच्या एकूण नफ्यांमध्ये क्लाउडच्या नफ्याची भागीदारी 2013 च्या तुलनेत 25 पट्टानी अधिक वाढली आहे. सांगण्यात येत आहे की, या व्यवहारानंतर रेड हॅटचे सीईओ जिम वाइटहर्स्ट त्यांच्या टीमबरोबर कंपनीतच राहणार आहेत.

Leave a Comment