सॅमसंगने सादर केली ५ जी कार


गुडवूड फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये सॅमसंगने जगातील पहिली रिमोट कंट्रोल फाईव जी कार वोडाफोन आणि डेझीनेटेड ड्रायव्हरच्या सहकार्याने सादर केली असून या कारच्या माध्यमातून सॅमसंगने फाईव्ह जी ची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरात ऑटो तंत्रज्ञान दररोज अधिकाधिक प्रगत होते आहे. त्याला टेलीकम्युनिकेशनची साथ मिळाली तर काय चमत्कार घडू शकेल याची ही झलक मानली जात आहे. ही कार हजारो मैलावरून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने नियंत्रित करता येते.

ऑटो क्षेत्रात एमजी हेक्टर आणि हुंदाई व्हेन्यू या कार लाँच होण्यापूर्वीच त्यांच्याबाबत उत्सुकता होती. सर्वत्र या हाय टेक्नोलॉजीने युक्त इंटरनेट कनेक्टेड कार्स चर्चेत होत्या त्यात सॅमसंगने ही अतिप्रगत कार सादर करून नवी भर घातली आहे.


लिंकन एमकेआय या नावाने ही कार सादर करण्यात आली असून ती चालविण्यासाठी डेझीनेटेड ड्रायव्हर टेलीऑपरेशन सिस्टीम, नवा सॅमसंग गॅलेक्सी एस १० फाईव्ह जी व सॅमसंग व्हीआर हँडसेट शिवाय व्होडाफोन फाईव्ह जी नेटवर्कचा वापर केला गेला. ड्रीफ्ट चँपियन वॉग गिटीन ज्युनिअरने ही कार नियंत्रित करून नवा इतिहास रचला. त्याने ही पहिली व्हर्च्युअल रिअलिटी कार रिमोटने चालविली. डेझीनेटेड ड्रायव्हरजवळ फ्रंटमध्ये ६ स्क्रीन, कार कंट्रोल करण्यासाठी स्टिअरिंग व्हील व पॅडल सिस्टीम दिली गेली आहे.


या कारचा सादरीकरण कार्यक्रम याप्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याने महत्वाचा होता. ट्रान्सअॅटलांटीक म्हणजे गुडवूड फेस्टिव्हल जेथे या कारचे प्रात्यक्षिक दाखविले गेले ते अंतर ५ हजार मैलाचे होते. तरीही इतक्या दुरून कार रिमोटने कंट्रोल करण्यासाठी वेळ अगदी कमी म्हणजे १०० मिलीसेकंद होता. हा वेळ इतका कमी असण्याचे कारण फाईव्ह जीचा अतिप्रचंड वेग हे आहे.

Leave a Comment